मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली शासन निर्णयात नमूद असून त्या अनुषंगाने गुण देण्यात येणार असल्याने ती व्यवस्थित व परिपूर्ण भरणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) हे ग्रामीण भागातील विकास हा ग्रामपंचायत (Gram Panchayat) मार्फत शास्वत पदधतीने व्हावा आणि ग्रामीण भागातील लोकांना प्रोत्साहित करण्याकरिता अभियान निर्माण करण्यात आले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत (Gram Panchayat), पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज संस्थेला बक्षीस रक्कम शासनाने देऊ केले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) अंतर्गत मोहीम कालावधीत महारष्ट्र शासनाच्या , ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्र;-मुसपंअ-२०२५/प्र.क्र.१५२, E-११२३०५७/यो-११ बांधकाम भवन, मुंबई, दिनांक ०६ ऑगस्ट, २०२५ च्या शासन निर्णयात नमूद परिशिष्ट अ मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रश्नावली नमूद केली आह
सदर पुरस्कार रक्कम प्राप्त करण्याकरिता या अभियानात भाग घेऊन अभियानात नमूद केलेले घटक आणि त्या अनुषंगाने घटक निहाय गुण मिळविणे आवश्यक आहे. ऐकून १०० गुण स्पर्धेकरिता निर्गमित केले आहे. पुरस्कार रक्कम जिकण्यासाठी किवा प्रथम, द्वितीय किवा तृतीय स्थान घेण्यासाठी जास्तीत जास्त गुण ग्रामपंचायत (Gram Panchayat)ला घेणे आवश्यक आहे. वरील गुण घेनेकारिता दिलेल्या घटकांनुसार अभियानाची प्रश्नावली आणि त्या अनुषंगाने स्पर्धेत काम करणे आवश्यक आहे. अभियाबाच्या प्रश्नावली प्रमाणे अभिलेखे, दस्त, छायाचित्रे आणि इतर माहिती अभियानाच्या तपासणी व मुल्यांकन समितीला दाखविणे आवश्यक आहे. सदर सर्व बाबी तपासून मुल्यांकन समिती ग्रामपंचायतीचे गुणांकन करणार आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीकडे वस्तुस्थितीजन्य पुरावे असणे आवश्यक आहे.
एक नजर प्रश्नावली व गुणांकन बाबी यावर टाकूया
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) मध्ये भाग घेण्याकरिता ग्रामपंचायतीला online नोंदणी करणे आवश्यक आहे. ग्राम पंचायतीचा USER ID आणि PASSWORD असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली अभियानाची प्रश्नावली म्हणजे अभियानात दिलेल्या घटकावर काम करताना कोणत्या बाबीवर किती गुण आहे हे जाणून घेणे आहे. त्यातूनच प्रश्नावली निर्माण होते.
अभियानाचे घटक व त्यावरील प्रश्नावली बाबत माहिती
१- सुशासन युक्त पंचायत
१.१ लोकाभिमुख प्रशासन –
ग्राम पंचायत मार्फत दिल्या जाणा-या सेवा online पद्धतीने देणे नागरिकांना सुलभरीत्या देणे (लोकसेवा हक्क अद्यादेश-२०१५) अंतर्गत ७ प्रकारचे दाखले तसेच www.dccrs.gov.in द्वारे जन्म व मृतू बाबतचे दाखले तसेच अन्य online सेवा देणे. यात मोहीम कालावधीत आलेले अर्ज व त्यावर केलेली कार्यवाही अहवाल तपासून गुण दिले जाते. – यामध्ये प्राप्त अर्ज आणि निर्गमित केलेले अर्ज १०० % याकरिता १ गुण दिलेला आहे
१.२ नागरी सेवा सुविधा कंद्र दर्जा –
ग्रामपंचायत (Gram Panchayat) कडील आपले सेवा सरकार केंद्र सक्षम करून त्यास नागरी सेवा सुवूधा केंद्राचा दर्जा मिळविणे. त्याद्वारे सर्व दाखले देणे. लोकोपयोगी B2C सेवा उपलब्द करून देणे. उदा. सातबारा, मालमत्ता पत्रक, खाते उतारा, फेरफार दाखले. – सदर सेवा पुरविली असल्यास तपासून गुण दिले जाते. – यामध्ये प्राप्त अर्ज आणि निर्गमित केलेले अर्ज १०० % याकरिता १.५ गुण दिलेला आहे.
१.३ तक्रार निवारण –
ग्रामपंचायत (Gram Panchayat) कडे प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारीचे निवारण विहित मुदतीत करणे. दर्शनी भागात तक्रार पेटी लावून तक्रार अर्ज संकलन सुविधा निर्माण करणे – सदर बाबी तपासून गुण दिले जाते. यामध्ये प्राप्त अर्ज आणि निर्गमित केलेले अर्ज १०० % याकरिता ०.५ गुण दिलेला आहे.
१.४ ग्रामपंचायत (Gram Panchayat) वेबसाईट –
ग्रामपंचायतीची वेब साईट अद्यावत करून ग्रामपंचायतीची सर्व माहिती प्रसिद्ध करणे (सर्व निधी जमा खर्च, हाती घेतलेले कामे, पूर्ण झालेली कामे, माहिती अधिकारात कायद्यानुसार प्रसिद्ध कराव्याच्ची माहिती दर्शनी भागवर व वेब साईट वर प्रसिद्ध करणे. यात वेब सीते तयार करणे ०.५ गुण तर सदर माहिती प्रसिद्ध करणे ०.५ गुण आहेत
१.५ CCTV बसविणे –
ग्रामपंचायतीच्या ऐकून कार्यक्षेत्रात CCTV/CCTV द्वारे ग्रामपंचायत (Gram Panchayat) क्षेत्रात संरक्षण कारणास्तव नित्रण ठेवणे व उपाय योजना करणे – ग्रामपंचायत (Gram Panchayat) अंतर्गत लावले असल्यास १ गुण दिला जातो.
१.६ दप्तर अद्यावत करणे –
ग्रामपंचायत (Gram Panchayat) अंतर्गत नमुना १ ते ३३ व इतर आवश्यक सर्व नोंदवह्या अद्यावत ठेवणे व पंचायतीचे लेख परीक्षण होऊन सदर लेख परीक्षण अहवालाची ग्रामपंचायतीने पूर्तता करणे. ग्रामपंचायत (Gram Panchayat) दप्तर अद्यावत करणे १ गुण आणि लेख परीक्षण १०० % पूर्तता करणे १ गुण आहेत.
१.७ ग्रामपंचायत (Gram Panchayat) सर्व सभा व कार्यावृतांत नोंदवही अद्यावत करणे –
ग्राप अधिनियमानुसार मासिक्सभा, महिलासभा, वार्ड सभा व ग्रामसभा नियमित घेणे, त्याचे दप्तर अद्यावत ठेवणे, पोर्टल वर घेणे, सभेचे VIDIO SHOOTING घेणे. मोहिम कालावधीत एकाही सभा तहकूब झालेली नसावी. याकरिता १ गुण आहेत.
१.८ ग्राम विकास समिती कामकाज –
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचणे नुसार व ग्रामपंचायत (Gram Panchayat) अधिनियमातील तरतुदी नुसार कलम ४९ नुसार स्थापित सर्व समित्याचे कामकाज नोंदी ठेवणे आवश्यक आहे. सभा वृतांत नोंदवही अद्यावत ठेवली असल्यास १ गुण आहेत.
१.९ मतदार/नागरिकांनी App डाऊनलोड करणे –
शासनाच्या वतीने पारदर्शकता करिता मेरी पंचायत, पंचायत निर्णय, ग्राम संवाद या सारखे App नागरिकांनी डाऊनलोड करणे. मतदार संख्येच्या प्रमाणात डाऊनलोड केल्याची संख्या लक्षात घेता गुण देणे. याला १ गुण आहेत
१.१० आयुष्यमान भारत कार्ड –
केंद्र व राज्य शासनाच्या आयुष्यमान भारत कार्ड या योजनेचे लाभ सर्व पात्र लाभार्थीना मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे. एकुण पात्र लाभार्थी, पैकी कार्ड मिळालेले लाभार्थी याला १ गुण आहेत. कार्ड धारकापैकी आजारी पडलेले लाभार्थी व त्यापैकी लाभ मिळालेले लाभार्थी याला १ गुण आहेत.
१.११ अनिवार्य बाबींवरील तरतूद व खर्च -
ग्रामपंचायतीने बजेटनुसार ग्रामपंचायत (Gram Panchayat) कडील दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण तसेच मागासवर्गीय कल्याणावर अनुक्रमे ५ %, १०% व १५% तरतूद करणे व १००% खर्च करणे. केलेली तरतूद व झालेला खर्च, दिव्यांग कल्याण 5%, महिला व बालकल्याण 10%, मागासवर्गीय कल्याण 15% करणे आवश्यक आहे. याला १.५ गुण आहेत.
१.१२ दिव्यांग ओळखपत्र-
सर्व पात्र दिव्यांगांना ओळख पत्र मिळवून देणे. एकूण पात्र दिव्यांग लाभार्थी संख्या, पैकी कार्ड वितरीत केलेले दिव्यांग लाभार्थी संख्या याला गुण आहेत. १०० टक्के कामासाठी १ गुण आहेत.
२. सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी)
२.१ कर व पाणीपट्टी वसुली –
मोहीम कालावधीपर्यंत ग्रामपंचायत (Gram Panchayat)कडील घरपट्टी व पाणीपट्टी व इतर करांची चालू थकबाकी वसुली करणे, त्यासाठी QR code तयार करणे. एकूण कर मागणी व मोहीम कालावधी पर्यंत झालेली वसुली यावर ७ गुण आहेत.
२.२ लोकवर्गणी –
लोकवर्गणी मधून निधी उपलब्ध करुन घेणे व सदर निधी मधून लोकोपयोगी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. मोहीम कालावधी पर्यंत प्रति एक हजार लोकसंख्येस रु. दोन लक्ष या प्रमाणात लोकसंख्या विचारात घेऊन लोक वर्गणीचे उदिष्ट निश्चित करावे. उदिष्ट साध्याच्या प्रमाणात गुण देणे. लोकसंख्येनुसार लोकवर्गणीतून निधी जमा झाल्यास त्याप्रमाणात गुण अनुज्ञये आहेत. याला २ गुण आहेत.
२.३ स्वउत्पन्न (OSR) –
मोहीम कालावधीत ग्रामपंचायतीकडे गाळा, दुकानभाडे, जाहिराती, मोबाईल टॉवर भाडे व अवजारे बँक इ. यातून स्वउत्पन्न असणे व त्याची वसुली करणे, दप्तर तपासून गुण देणे याला १ गुण आहेत.
३ - जल समृध्द, स्वच्छ व हरीत गांव (Climate Action)
३.१ पाण्याचा ताळेबंद –
लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद (वॉटर बजेट) तयार करुन पाणी व्यवस्थापन आराखडा तयार करणे. ग्रामपंचायतीने जनजागृती, शिवार फेरी, इत्यादी उपक्रमातून लोकसहभागातून पाण्याचे ताळेबंद तयार करुन दर्शनी भागात लावणे. याला १ गुण आहेत.
३.२ शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा-
गावातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे शाश्वत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे FHTC (Functional Housing Tap Connection) देणे. एकुण कुटुंब संख्या व पैकी FHTC नळ कनेक्शन व नळाद्वारे शुध्द पाण्याचा पुरवठा असलेले कुटुंब संख्या १०० टक्के करिता याला १ गुण आहेत.
३.३ विद्युत देयके-
ग्रामचायंत नळ पाणी पुरवठा योजना व रस्त्यावरील दिवाबत्ती वीज देयकांचा नियमित भरणा करणे व थकबाकी शून्य असणे. ग्रामपंचायत (Gram Panchayat) नळ पाणी पुरवठा योजना वीज देयकांचा नियमित भरणा करुन थकबाकी शून्य असेल तर पुर्ण गुण देणे. अन्यथा अभियान कालावधीत थकबाकी भरणा केल्याच्या प्रमाणात गुण देणे. रस्त्यावरील दिवाबत्ती वीज देयकांचा नियमित भरणा करणे व थकबाकी शून्य असेल तर पुर्ण गुण देणे. अन्यथा प्रमाणात गुण देणे. १०० टक्के असल्यास २ गुण आहेत.
३.४ पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण –
गाव क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करण्यासाठी तलाव, नदी, नाले पुनर्जिवित करणे संवर्धन करणे व पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, जल स्त्रोत संवर्धनासाठी वनराई बंधारे तयार करणे, सिमेंट बंधारे व केटी वेअर यांचे गेट बसविणे. खात्री करुन 100% स्त्रोतांचे बळकटीकरण केल्यास पुर्ण गुण देणे. यास १ गुण आहेत.
३.५ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट –
गावातील सर्व शासकीय व निमशासकीय संस्था यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट स्थापित करणे. ग्रामपंचायत (Gram Panchayat) क्षेत्रातील शासकीय व निमशाशकीय संस्था येथील इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग तयार करणे व प्रगतीनुसार गुण देणे. यास १ गुण आहेत
३.६ सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे –
ग्रामपंचायत (Gram Panchayat) अंतर्गत क्षेत्रातील शासकीय/निमशासकीय क्षेत्रात झाडे, बगिचा, फळबाग या करिता सुक्ष्म सिंचनाचा वापर करणे. ग्रामपंचायत (Gram Panchayat) क्षेत्रातील शासकीय व निमशाशकीय क्षेत्रात झाडे, बगीचा, फळबाग याकरीता सुक्ष्म सिंचनाचा वापर केला असल्यास तपासून गुण देणे. यास ०.५ गुण आहेत.
३.७ अपांरपरिक ऊर्जा व सौर ऊर्जा वापर –
नळ पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर रुपांतर करणे, ग्रामपंचायत (Gram Panchayat) इमारतीमध्ये सोलर युनिट बसवून 100% वीज सोलर वरुन घेणे, प्रधानमंत्री सुर्यघर योजना / अन्य योजनेतून टप्पा-2 मधील घरकुलांना सौर ऊर्जा प्रकल्प बसविणे. पूर्ण झालेल्या टप्पा -2 मधील घरकुला व्यतिरीक्त गावातील इतर किमान 20 टक्के घरांसाठी सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत करणे. यास ५ गुण आहेत.
३.८ वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे –
अभियान कालावधीत ग्रामपंचायत (Gram Panchayat) अंतर्गत जिओटॅगिंगसह लोकसंख्येनुसार नवीन वृक्षलागवड करुन वृक्षसंवर्धन करणे, या अंतर्गत किमान 1 व्यक्ती 1 झाड लावणे (यापूर्वीची वृक्षलागवड वगळून) वृक्ष लागवड प्रमाणात २ गुण आहेत.
३.९ संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवणे –
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत दिनांक निहाय उपक्रम आयोजित करून त्याबाबत अंमलबजावणी करून सक्रिय सहभाग घेणे. ग्रामपंचायत (Gram Panchayat) दस्तऐवज ऑनलाईन अहवाल तपासून त्याप्रमाणे गुण देणे. याला १ गुण आहेत.
३.१० प्लास्टिक बंदी –
प्लास्टिक बंदी बाबत गावात प्रभावी अंमलबजावणी केलेली असावी. एकल प्लॅस्टिक वापर पूर्णतः बंद करणे दडात्मक कारवाई केलेली असावी. 1. प्लास्टिक बंदी 100% केलेली असवी. 2. किती नागरिकांच्या वर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 3. कारवाई अंतर्गत किती दंड वसून करण्यात आला. प्लास्टिक बंदी बाबत गावात प्रभावी अंमलबजावणी केलेली असेल त्याबाबत क्षेत्रीय अहवाल, ग्रामपंचायत (Gram Panchayat) दस्तऐवज 100% अंमलबजावणी असणे. याला १ गुण आहेत.
३.११ घनकचरा व्यवस्थापन-
घनकचरा व्यवस्थापन शास्त्रशुद्ध रितीने असणे (सुका कचरा व ओला कचरा विलगीकरण करून संकलन करणे, ओल्या कचऱ्यापासून खत बनविणे, सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे. सुका व ओला करचा विलगीकरण करुन ग्रामपंचायतीने त्याचे संकलन करणे, ओल्या कचऱ्यापासून ग्रामपंचायतीने खत बनविणे. ग्रामपंचायतीने सुक्या कचऱ्याचे शास्त्रशुध्द व्यवस्थापन करणे. ग्रामपंचायत (Gram Panchayat) दस्तऐवज, अहवाल ऑनलाईन अहवाल तपासणी तसेच प्रत्यक्ष पाहणी करुन प्रगतीनुसार गुण देणे. याला १.५ गुण आहेत.
३.१२ सांडपाणी व्यवस्थापन-
सांडपाणी व्यवस्थापन शास्त्रशुद्ध रितीने असणे (शोषखड्डा, एस.टी.पी व इतर उपाय योजना करणे), एकुण कुटुंब संख्या पैकी शोषखड्डे असणारी कुटुंब संख्या, ग्रामपंचायतींनी शोषखड्डा, एफ,एस.टी.पी. डी व्हॅट तंत्रज्ञानाचा वापर करुन तपासून सांडपाणी व्यवस्थापनाची 100% अंमलबजावणी असल्यास पूर्ण गुण देणे. याला १ गुण आहेत.
४ - मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण
४.१ महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून गावामध्ये रोजगार निर्माण करणे, गावामध्ये स्थावर मालमत्ता निर्माण करणे (उदा. गावातील ५० मजूरांना ९० दिवस काम दिले तर = मजूर ५० X ९० दिवस X रुपये ३१२ = रु १,४०४,०००/-) –
एकुण सार्वजनिक किमान 20 कामांची उद्दिष्ट संख्या व पैकी मनरेगा अंतर्गत पूर्ण केलेल्या कामांची संख्या, प्राप्त निधी (किमान 10 लाख) व मनुष्यदिन निर्मिती व अभियान कालावधी पर्यंत ग्रामपंचायतीकडील विकास कामावर मनरेगा अंतर्गत किती निधीचे अभिसरण केले. ग्रामपंचायत (Gram Panchayat) दस्तऐवज तपासून प्रगतीनुसार गुण देणे उद्दिष्टानुसार मनुष्यदिन निर्मितीच्या प्रमाणात गुण २ गुण आहेत.
४.२ निर्मल शोषखड्डा (वैयक्तिक /सामुदायिक), जलतारा कामे, विहिर पुनर्भरण, rain water harvesting, छतावरील पाणी संकलण –
एकुण किमान कामांची उद्दिष्ट संख्या, पैकी पूर्ण झालेले कामांची संख्या व जलतारा शोषखड्डे धारक शेतकरी संख्या आधारे गुण देणे. याला १ गुण आहेत.
४.३ नवीन विहीर/विहीर दुरुस्ती/विहीर पुनर्भरण, शेततळे, ढाळीचे बांध, अनगड दगडी बांध कामे –
एकुण किमान कामांची उद्दिष्ट संख्या, पैकी पूर्ण झालेले कामांची संख्या व शेतीशी निगडित / शेतीपूरक कामे संख्या आधारे गुण देणे. याला १ गुण आहेत.
४.४ जनावराचा गोठा/कुक्कुट पालन शेड / बायोगॅस उभारणी / शेळीपालन शेड, नॅडप/व्हर्मी कंपोस्टिंग, कांदा चाळ-
एकुण किमान 5 कामांची उद्दिष्ट संख्या, पैकी पूर्ण झालेले कामांची संख्या व शेतीशी निगडित / शेतीपूरक कामे संख्या आधारे गुण देणे. याला १ गुण आहेत.
४.५ घरकुल व मनरेगा अभिसरण –
एकुण मंजूर घरकुलांची संख्या, पैकी मनरेगा सोबत अभिसरण करुन पूर्ण केलेल्या घरकुलांची संख्या व एकूण मंजूर घरकुलांच्या कामाच्या संख्येच्या 100% कामे अभिसरणाद्वारे पूर्ण होणे आवश्यक आहे. याला १ गुण आहेत.
५ - गावपातळी वरील संस्था सक्षमीकरण –
५.१ ग्राम पंचायत सक्षमीकरण –
ग्रामपंचायत (Gram Panchayat) या ठिकाणी मिटींग हॉल, प्रतिक्षालय, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत (Gram Panchayat) अधिकारी यांचेकरीता स्वतंत्र बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा देणे,सुविधा, दिव्यांग साठी Ramp, दर्शनी भागावर सर्व योजनांचे फलक, वाचनालय व संगणकीकृत ग्रंथालय, महिला व पुरुष स्वतंत्र स्वच्छातागृह, रंगरंगोटी व सुशोभीकरण असणे, याला ३.५ गुण आहेत.
५.२ शाळा सुविधा सक्षमीकरण गावातील सर्व शाळा डिजिटल करणे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा, पोषक परसबाग असणे, सोलर युनिट कार्यान्वित करणे, बोलक्या भिंती रंगविणे इत्यादी-
एकुण शाळा संख्या सुविधा असणाऱ्या शाळा, सर्व शाळा डिजिटल करणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा देणे, मुलांच्या संख्येच्या प्रमाणात मुला व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह, हॅण्ड वॉश स्टेशन सुविधा असणे. सर्व शाळा रंगरंगोटी करणे, बोलक्या भिंती रंगविणे, पोषक परसबाग सुविधा उपलब्ध असणे, माध्यान्ह भोजन योजना अंतर्गत किचन व्यवस्था असणे. सर्व वर्गात CCTV बसविणे, संरक्षण भिंत बांधणे असणे, याला ४.५ गुण आहेत.
५.३ अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण गावातील सर्व अंगणवाडी डिजिटल करणे, बालस्नेही स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा, पोषक परसबाग असणे, सोलर युनिट कार्यान्वित करणे, बोलक्या भिंती रंगविणे-
एकूण अंगणवाडी संख्या, सुविधा असणाऱ्या अंगणवाडी, गावातील सर्व अंगणवाडी डिजिटल करणे, बालस्नेही स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा, पोषक परसबाग असणे, सौर दिवे व वृक्षारोपन करणे याला २ गुण आहेत.
५.४ पशुवैद्यकीय उपचार केंद्र- या ठिकाणी स्वच्छता गृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा देणे. सुविधा, जनावरांसाठी खोडा तसेच घनकचरा व सांडपाणी शास्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन असणे, उपचार केंद्र नसल्यास खोडा व उपचार सेवा सुविधा उपलब्ध असणे-
पशु वैद्यकीय उपचार केंद्र येथे निर्देशांक नुसार सर्व सुविधा / पुर्तता असल्यासच तसेच पशुधन अधिकारी पंचायत समिती यांचे प्रमाणपत्र तपासून पूर्ण गुण देणे. याला १ गुण आहेत.
५.५ स्मशानभूमी मध्ये शेड, पाण्याची सोय, सौर दिवे, पोहोच रस्ता, वृक्षारोपण इ. सुविधा –
सदर सोयीच्या उपलब्ध सुविधांनुसार गुण देणे. याकरिता २ गुण आहेत.
५.६ व्यायामशाळा/खुली व्यायाम शाळा सुविधा उपलब्ध करून देणे –
खुली व्यायामशाळा असल्यास 0.5 गुण व सुविधापूर्ण व्यायामशाळा असल्यास पूर्ण 0.5 गुण देणे. याला १ गुण आहेत.
५.७ धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण –
ग्रामपंचायत (Gram Panchayat) क्षेत्रातील तीर्थक्षेत्राचा / धार्मीक स्थळाचे / पर्यटन स्थळाचे सुशोभिकरण करणे. त्याकरिता २ गुण आहेत.
६ - उपजिविका विकास, सामाजिक न्याय
६.१ प्रधानमंत्री आवास योजना व राज्यस्तरीय घरकुल योजनेतून मागील अपूर्ण व नवीन मंजूर सर्व घरकुल काम पूर्ण करणे –
PMAY-1 मधील व सर्व राज्यपुरस्कृत योजनेमधील दि. 01.04.2025 रोजीचे अपूर्ण घरकुल संख्या, PMAY-टप्पा 2 व राज्यपुरस्कृत योजने मधून नवीन मंजूर घरकुल संख्या, घरकुल मंजूर झाले तथापी एकूण भुमिहीन / जागा नसलेले लाभार्थी संख्या, त्यापैकी अभियान कालावधी अखेर पूर्ण केलेली घरकुल संख्या, टप्पा २ ची पूर्ण घरकुलांची संख्या, पैकी किती जणांना जागा उपलब्ध करुन दिली, याकरिता ९ गुण आहेत.
६.२ गावातील बचत गटामध्ये महिला मतदार लोकसंख्येच्या प्रमाणात महिला सहभाग असणे. उमेद (MSRLM) अंतर्गत पात्र बचत गटांना बँके मार्फत कर्ज वितरण करणे –
एकूण महिला मतदार संख्या, पैकी बचत गटात सहभागी महिला मतदार संख्या, लाभासाठी एकूण पात्र असणारे बचत गट संख्या, पैकी लाभ दिलेले बचत गटसंख्या व पात्र बचत गटांपैकी बँकेमार्फत कर्ज वितरण केलेल्या बचत गटांची संख्येनुसार गुण देणे आहे. या बाबतीत २ गुण आहेत.
६.३ बचत गटातील महिलांना लखपती दिदी करणे-
बचत गटातील एकुण महिला, पैकी अभियानाअखेर एकुण लखपती दिदि झालेल्या महिलांची संख्या यांच्यानुसार गुण दिले जाते. यावर ३ गुण आहेत.
६.४ ग्रामपंचायत (Gram Panchayat) क्षेत्रातील स्वयंसहायता समूह माध्यम, शेतकरी उत्पादक संस्थामध्ये महिलांचा सहभाग असणे व स्वतंत्र संस्था स्थापन करणे-
एकुण शेतकरी महिला संख्या (स्वतंत्र 7/12/ संयुक्त 7/12, पैकी शेतकरी उत्पादक संस्थेत सहभागी शेतकरी महिला संख्या व मोहीम कालावधीपर्यंत आर्थिक वर्षात ग्रामपंचायत (Gram Panchayat) क्षेत्रात किमान 1 महिलाची शेतकरी उत्पादक संस्था स्थापन असावी शासनमान्य प्रमाणपत्र आधारे गुण देय राहतील. यावर १ गुण आहेत
६.५ गावातील पात्र सुशिक्षित उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे व बँकेमार्फत कर्ज वितरण करणे
प्रशिक्षणासाठी एकुण पात्र असणारे लाभार्थी संख्या, पैकी प्रशिक्षण दिलेले लाभार्थी संख्या तसेच एकुण प्रशिक्षण दिलेले पात्र असणारे लाभार्थी संख्या व पैकी कर्ज वितरण लाभ दिलेले लाभार्थी संख्या यांचे उदिष्ट लक्षात घेऊन गुण दिले जातात. यावर २ गुण आहेत.
६.६ सामाजिक अर्थसहाय योजनेअंतर्गत गावातील वंचित सर्व पात्र लाभार्थी यांना लाभ देणे. (केंद्र/राज्य) –
एकुण पात्र लाभार्थी संख्या, पैकी लाभ मिळत असणारे लाभार्थी संख्या निच्छित करणे. अभियान कालावधीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पात्र लाभार्थीचे प्रस्ताव तयार करुन त्यास मान्यता घेणे. श्रावण बाळ योजनेत पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करुन मान्यता घेणे, इंदिरा गांधी राष्टीय वृध्दापकाळ योजना पात्र लाभार्थी प्रस्ताव तयार करुन मान्यता घेणे, राष्ट्रीय कुंटुब लाभयोजना पात्र लाभार्थ्याचे प्रस्ताव तयार करुन मान्यता घेणे, ग्रामपंचायत (Gram Panchayat) क्षेत्रातील शेतकऱ्याची अॅग्रीस्टैंक पोर्टलवर नोंदणी करणे. यांच्या उदिष्ट पूर्ती नुसार गुण आहेत. यावर ४ गुण आहेत.
६.७ गावातील शेतकऱ्यांनी गट शेती मध्ये सहभागी होऊन शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करणे, सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन करणे व गटाद्वारे व्यवसाय करणे-
मोहीम कालावधीपर्यंत आर्थिक वर्षात ग्रामपंचायत (Gram Panchayat) क्षेत्रात शेतकरी उत्पादक संस्था स्थापन असावी शासनमान्य प्रमाणपत्र आधारे 0.5 गुण देय राहतील. 2.गटाद्वारे व्यवसाय सुरु केला असल्यास 0.5 गुण आहेत.
६.८ ॲनिमिया मुक्त गाव संकल्पना राबविणे –
अभियानाच्या सुरवातीस महिलांची तपासणी करून किती % महिला अॅनिमिया मुक्त झाल्या त्याबाबत अंमलबजावणी असल्यासच पूर्ण गुण आहेत. यावर १ गुण आहेत.
७ - लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे
७.१ लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ उभी करून आठवडयातून किमान एक दिवस श्रमदान करणे. गावात स्वच्छता राखणे –
दर आठवड्यातून एकदा श्रमदान केले असल्यासच गुण देणे. श्रमदान कार्यक्रमात लोकसंख्येनुसार किमान शंभर / दोनशे / तीनशे ग्रामस्थाचा सहभाग असल्यासच गुण देणे. अभियान कालावधीत श्रमदानातून मनुष्य दिन निर्माण झाले आहे या बाबत ग्रामपंचायत (Gram Panchayat) कडील दस्तऐवज तपासून १००% अंमलबजावणी असणे, यावर २.५ गुण आहेत.
७.२ रस्त्याची कामे व रस्ते दुरुस्ती करणे तसेच पाणंद रस्ते प्राधान्याने कामे करणे व दुरुस्त करणे –
कच्चया रस्ताची एकूण लांबी (कि.मी.), पैकी किती रस्ता दुरुस्त अथवा नव्याने तयार केलेली लांबी (कि.मी.) व ग्रामपंचायत (Gram Panchayat) व महसूल दस्तऐवजानुसार किमान ५०० मिटर असल्यास गुण देय राहील. तसेच पाणंद रस्ते करावयाची कामे संख्या व लांबी (कि.मी.), पैकी किती पाणंद रस्ते दुरुस्त अथवा नव्याने तयार केलेली पाणंद रस्त्याची लांबी (कि.मी.) व ग्रामपंचायत (Gram Panchayat) व महसूल दस्तऐवजानुसार किमान ५०० मिटर असल्यास गुण देय राहील. यावर २.५ गुण आहेत.
८ - नाविन्यपूर्ण उपक्रम
८.१ ग्रामपंचायतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे –
ग्रामपंचायतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असल्यास प्रत्येक नाविन्यपूर्ण उपक्रमास 1 गुण देय आहेत. यावर ५ गुण आहेत.
वरील प्रमाणे गुणांप्रमाणे प्राप्त गुण लक्षात घेऊन ग्रामपंचायत (Gram Panchayat)ला पुरस्कार देण्यात येणार आहे. गावाचा विकास करिता सर्व ग्रामपंचायतीनी या अभियानात भाग घेऊन विकास करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.