gppanchayat.com

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मुख्य घटक

                मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मुख्य घटक (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) शासनाने नव्याने सुरु केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan महारष्ट्र शासनाने सन २०२५-२०२६ मध्ये सुरु केले असून, ग्रामीण विकास व्हावा हा त्या मागचा उद्देश आहे. ग्रामीण भागातील शास्वत विकास हा महत्वाचा भाग या अभियानाचा आहे. तसेच ग्रामीण भागाला या विकासात प्रोत्साहित करून विकासाच्या प्रवाहात आणणे हा महत्वाचा भाग या  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) याचा आहे. महारष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने या अभियान संदर्भात दिनांक ६ ऑगस्ट २०२५ ला शासन निर्णय निर्गमित केला आहे.

              संयुक्त राष्ट्र संघाने (UNO) शास्वत विकासाकरिता जागतिक परिवर्तन कार्यक्रम हाती घेतला आहे. यात १७ शास्वत विकासाठी १७ ध्येये निश्चित केली आहेत. त्यात उद्दिष्टे देखील शामिल केली आहे. भारतात याबाबत सन २०१६ पासून अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. भारता सरकारच्या पंचायतराज विभागाने या शास्वत विकासाकरिता याचे रुपांतर हे ९ संकल्पनेत रुपांतर केले.आहे. या विकासाच्या अनुषंगाने विविध विभाग हे काम करीत आहे. ग्रामीण विकासामध्ये पंचायतराज संस्था यांचे मोठ योगदान आहे.  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मुख्य घटक यावर काम करून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे आणि त्यातून शास्वत विकास घडविणे हा उद्देश आहे.ग्राम पातळीवर स्थानिक स्वराज संस्था म्हणून ग्रामपंचायत (Gram Panchayat) कार्यरत असून त्यांना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे. ग्रामीण विकास विभागाच्या विविध योजना ह्या राबविल्या जातात.सदर योजना ह्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण भागातील लोकांना सुलभ सेवा देणे, आरोग्य, शिक्षण व उपजीविका या क्षेत्रात सहभाग वाढविणे आणि ग्रामपंचायत (Gram Panchayat), पंचायत समित्या आणि जिल्हापरिषद यांना गतिमान करणे याकरिता हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायतीस कामगिरीनुसार प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविणे, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना या अभियानाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात बक्षीस देऊन गौरविण्यात येत आहे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मुख्य घटक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मुख्य घटक (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan)

               मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मुख्य घटक (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) खालीप्रमाणे आहे.

१. सुशासन युक्त गाव गाव तयार करणे

२. सक्षम पंचायत तयार करणे

३. जल, समृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे

४. MGNREGA व इतर योजनेचे अभिसरण करणे,

५. गाव पातळीवर संस्थेचे बळकटीकरण  करणे

६. उपजीविका विकास, सामाजिक न्याय

७. लोकसहभाग आणि श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे

८. नाविन्यपूर्ण उपक्रम

               मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) अभियान अंतर्गत वरील घटकावर केलेल्या कामाच्या अनुषगाने पुरस्कार करिता निवड केली जाईल. कामगिरीच्या आधारे गुणांकन करून पुरस्कार करिता निवड केली जाते. 

अभियानाचा कालावधी

            या अभियान मधील मुख्य घटक (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) यावर काम करण्याचा कालावधी शासन निर्णयात नमूद आहे. मंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) कालावधी दिनांक १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर असा आहे.

अभियानाची पूर्व तयारी.खालीलप्रमाणे करण्यात आली आहे

                     या अभियान मधील मुख्य घटक यावर कार्यवाही करण्यासाठी अभियाना राबविताना पूर्व तयारी हि खालीलप्रमाणे करण्यात आली.

१. दिनांक १ ऑगस्ट पासून राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर बैठका घेण्यात आल्या.
२. तालुका व जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले.
३. संपर्क अधिकारी नेमण्यात आले.
४. ग्राम पंचायत स्तरावर १७ सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेण्यात आल्या.
५. सर्व दैनंदिन अहवाल App वार पाठवणे
६. संत गाडगेबाबा अभियानाची प्रभावी अमलबजावणी.करणे

               मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) मध्ये काम करणेसाठी ग्रामपंचायतीची महत्वाची भूमिका असल्याने त्याची अमलबजावणी होण्यासाठी सरपंच/प्रशासक यांच्या अधाक्षेखाली समिती स्थापन करण्यात आली असून सादर समितीमध्ये ग्रामपंचायतीचे सर्व पदाधीकारी व ग्राम पातळीवर काम करणारे सर्व अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला. समितीचे सचिव म्हणून ‘ ग्राम पंचायत अधिकारी ‘’ हे काम पाहतील. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) या अभियानाची प्रभावी अमलबजावणी करून जास्तीत जास्त गुण मिळवणे हे या समितीचे कार्य राहतील. या  अभियान मध्ये (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) मुख्य घटक यावर काम करणे  अपेक्षित आहे. 

                या अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) अंतर्गत काटेकोर अमलबजावणी साठी विभाग, जिल्हा व पंचायत समिती स्तरावर सानियत्रण व मुल्यांकन यंत्रणा समिती नियोजन करतील.

१. विभागीय आयुक्त हे विभागातील सर्व जिल्हासाठी, अप्पर आयुक्त/उप आयुक्त/उपसंचालक/सह आयुक्त या दर्जाचा पालक अधिकारी नेमणूक करेल.

२. मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रत्येक तालुक्यासाठी जिल्हा परिषद विभाग प्रमुख यांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करतील

३. गट विकास अधिकारी हे पंचायत समीति स्तरावरून तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ करिता पंचायत समितीमधील विभाग प्रमुख यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करतील.

अभियान संदर्भात मुख्य घटक व त्यानुसार गुण :-

               मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) अंतर्गत खालीलप्रमाणे मुख्य घटक विषय आणि गुण समविष्ट आहे. 
१. सुशासन युक्त गाव गाव तयार करणे – एकून गुण – १६
२. सक्षम पंचायत तयार करणे – एकून गुण – १०
३. जल, समृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे – एकून गुण – १९
४. MGNREGA व इतर योजनेचे अभिसरण करणे – एकून गुण – ०६
५. गाव पातळीवर संस्थेचे बळकटीकरण करणे – एकून गुण – १६
६. उपजीविका विकास, सामाजिक न्याय – एकून गुण – २३
७. लोकसहभाग आणि श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे – एकून गुण – ०५
८. नाविन्यपूर्ण उपक्रम – एकून गुण – ०५
               या अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) मध्ये सहभाग नोंदवने आवश्यक आहे आणि कामगीरी करून उत्कृष्ट ग्रामपंचायत (Gram Panchayat), पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना पुरस्कार प्राप्त करून घेता येईल असे शासन निर्णयात नमूद आहे. या अभियानात ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना प्रोत्साहित करण्यात आलेले आहेत. 

                सदर अभियान स्थानिक स्वराज्य संस्थाना वरदान ठरणारे अभियान आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) या अभियानात स्थानिक स्वराज्य संस्थाना मिळणारे पारितोषिके हि मोठ्या रकमेचे असून तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवरील पारितोषिके मिळविण्याची संधी स्थानीक स्वराज्य संस्थाना प्राप्त झाले आहेत.  हे अभियान एक उत्कृष्ट (Excellent) आणि ग्रामीण भागाचा विकास करणारे  अभियान.. आहे. 

E-TENDER

E-TENDER

Hot News E-TENDER TENDER मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj...
Read More →
TENDER

TENDER

Hot News E-TENDER TENDER मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj...
Read More →
  • All Posts
  • अभियान बाबत
  • माहिती जाणून घ्या...!
  • योजना बाबत
E-TENDER

December 7, 2025/

Hot News E-TENDER TENDER मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj...

TENDER

December 7, 2025/

Hot News E-TENDER TENDER मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj...

Scroll to Top