gppanchayat.com

E-TENDER

E-TENDER

E-TENDER निविदा

E-TENDER निविदा हि प्रक्रिया करणे व समजण्यास फार सोपी आहे. फक्त एकदा स्वत: ग्रामपंचायतीने संगणक परिचालक यांच्या जवळ बसून शिकणे आवश्यक आहे. ती ONLINE कशी हाताळावी याबद्दल आणि हि प्रक्रिया पार पडताना कोणत्या STEPS असतात याची सविस्तर माहिती आपणास याद्वारे देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

E-TENDER करावयाच्या पायऱ्या (STEPS) / FLOW CHART

1 TECHNICAL SANTION
2 ADMISTRATION SANTION
3 CREATE NIT (Notice Inviting Tender)
4 CREATE BOQ (Bill Of Quantity)
5 LOGIN IN E-TENDER PORTAL BY DSC.                                                                                                                6 FILL ALL TABS OF TENDER FORM
7 PUBLISH E-TENDER
8 CORRIGENDUM
9 OPEN E-TENDER BY LOGIN DSC
10 ACCEPT E-TENDER
11 OPEN TECHNICAL COVER – 1
12 OPEN FINANCIAL COVER – 2
13 LOWEST E-TENDER – 1
14 CHAKE ADDITIONAL SECURITY PERFORMANCE DD (IF BELOW TENDER)
15 AOC (AWARD OF CONTRACT)

E-TENDER

1. TECHNICAL SANTION

E-TENDER निविदा करावयाच्या कामाला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी (संदर्भ- महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ मधील परिशिष्ट -3 पहा) आवश्यक आहे. जेव्हा ही मंजुऱ्या प्राप्त होईल तेव्हाच कामाच्या निविदा प्रक्रिया करता येते.

2. ADMISTRATION SANTION

प्रशासकीय मंजुरी – कामाला तांत्रिक मंजुरी प्राप्त झाल्यावर सदर कामाला प्रशासकीय मंजुरी हि ग्राम पंचायतीच्या मासिक/ग्राम सभेची घेणे आवश्यक आहे. मासिक सभा ठराव – तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी प्राप्त कामाच्या निवीदा करण्याबाबत ठराव ग्रामपंचायत मासिक/ग्राम सभेत घेण्यात यावा.

3. CREATE NIT (Notice Inviting Tender)

वरिष्ठ कार्यालयाकडून कामाची जाहिरात देण्यासाठी कामाच्या किमती नुसार वृत्तपत्राचे रोस्टर घ्यावे.
E-TENDER निविदा प्रसिद्धी बाबतचा मसुदा तयार करावा लागतो. या मसुदा मध्ये साधारणता खालील बाबी समाविष्ट करणे आवश्यक आहे. तयार केलेल्या या मसुद्याला E-TENDER निविदा प्रणालीच्या भाषेत NIT (Notice Inviting Tender) म्हणतात.
१. निविदाची वेळ क्रमांक – १, २, किवा ३ जी असेल ती वर नमूद करावे.
२. कार्यालयाचा पूर्ण पत्ता नमूद करावा.
३. निविदा बोलाविण्याचा कालावधी दिनांक पासुन ते पर्यंत स्पष्ट नमूद करावा.
४. निविदा उघडण्याची तारिख, वेळ व स्थळ नमूद करावे.
५. निविदा फी, निविदा बयाना रक्कम (प्राकलन (ESTIMATE) च्या १ टक्का) नमूद करावी.
६. निविदा दोन लिफाफा पद्धतीने घ्यावी. Online E-TENDER निविदा  प्रणालीत मागितलेल्या लिफाफा यांना COVER असे म्हणतात. यात एक तांत्रिक लिफाफा (मागितलेली कागदपत्रे) (Technical Cover) व दुसरा आर्थिक लिफाफा (कामाचे दर) (Finalcial Cover) या प्रमाणे निविदाधारक यांच्याकडून निविदा बोलवावी.
७. निविदेच्या अटी व शर्ती स्पष्ट नमूद कराव्यात. यात निविदाधारक यांच्या कडून आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्राचा उल्लेख करावा. (उदा. नोंदणी प्रमाणपत्र, pancard, Adhar Card, GST, व्यवसाय कर व उत्पन्न कर भरल्याबाबत प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, सुरु असलेली कामे, पूर्ण केलेली कामे बाबत माहिती व काळ्या यादीत नसल्याबाबत व चुकीची माहिती सादर न केल्याबाबत प्रतिज्ञालेख व इतर आवश्यक अनुषंगिक माहिती मागवावी)

4. CREATE BOQ (Bill Of Quantity)

तसेच E-Tender निविदा  करिता BOQ (Bill Of Quantity) तयार करावे लागते. BOQ म्हणजे निविदा धारक यांना ज्या दराने निविदा सादर करावयाची आहे ते दर टाकण्यासाठी तयार केलेले एक Formate असते. हे Formate Excell मध्ये असून हि sheet protect करून पुरवावी लागते. यात फक्त निविदा भरताना निविदाधारक यांना फक्त दरच नमूद करता येतात इतर कोणतीही माहिती भरता येत नाही.

5. LOGIN IN E-TENDER PORTAL BY DSC .

वरील NIT तयार झाल्यानंतर निविदा समिती मधील कोणत्याही दोन समिती सदस्य यांच्या DSC (Digital Signature Certificate) च्या साह्याने ग्रामपंचायतीला E-Tender Online प्रसिद्ध करता येतात.
E-Tender निविदा हे महाराष्ट्र शासनाच्या https://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर (Website) वर ग्रामपंचायतच्या निविदा समितीच्या सदस्याचे DSC Login करून प्रसिद्ध करता येते.

6. FILL ALL TABS OF E-TENDER FORM

E-Tender निविदा प्रसिद्धी करिता DSC द्वारे Login केल्यावर Online Portal वर विचारलेली सर्व माहिती भरावी. हि भरवायची माहिती तयार केलेल्या NIT मध्ये आपण लिहिलेली आहे. उदा. कामाचे नाव, कामाची रक्कम, निविदा फी, बयाना रक्कम, मागितलेले लिफाफे, व कागदपत्रे आणि सर्व आवश्यक त्या तारखा एवढीच माहिती भरावी लागते. NIT व BOQ उपलोड करावे लागते.

7. PUBLISH E-TENDER

शेवटी Publish बटन वर click करून E-Tender निविदा प्रसिद्ध करावी लागते.

8. CORRIGENDUM

E-TENDER निविदा  प्रक्रियेत निवेदेत काही बदल करावयाचा असल्यास किवा माहिती सुधारण्याची गरज असल्यास शुधीपत्रक तयार करता येते. त्या प्रणालीला E-TENDER निविदा मध्ये Corrigendum असे म्हणतात.
निविदा प्रसिद्ध केल्यानंतर निविदेत काही तांत्रिक चुका झाल्या असेल तर त्याबाबत शुद्धीपत्रक प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. ती कार्यवाही करावी. याकरिता परत निविदा प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

9. OPEN E-TENDER BY LOGIN DSC

हि प्रक्रिया अत्यंत महत्वाची व न समझणारी व गुंतागुंतीची आहे. या बारकाईने कार्यवाही करणे आवश्यक आहे. प्राप्त होणाऱ्या प्रत्येक निविदा ह्या Online Portal वर दिसून येतात. किती निविदा आल्या त्या पाहता येतात. पण त्या तेव्हाच उघडून पाहू नये. निविदा किती आल्या तपासून घ्याव्यात, निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी व स्पर्धातम विचार व्हावा यासाठी किमान तीन निविदा मध्ये तुलनात्मक स्पर्धा होणे आवश्यक आहे. यांचा अर्थ निविदा प्रक्रिया पूर्ण करणेसाठी किमान तीन निविदा प्राप्त होणे आवश्यक आहे. कामाच्या तीन निविदा प्राप्त न झाल्यास परत निविदा- दुसरी वेळ असे नमूद करून निविदा पुन्हा पूर्वीप्रमाणे प्रसिद्धीची कार्यवाही करावी. दुसऱ्या निविदेच्या वेळेला देखील किमान तीन निविदा प्राप्त न झाल्यास परत निविदा – तिसरी वेळ असे नमूद करून निविदा पुन्हा पूर्वीप्रमाणे प्रसिद्धीची कार्यवाही करावी. तिसऱ्या निविदेच्या वेळी मात्र तीन निविदा प्राप्त न झाल्यास देखील निविदा उघडता येईल व त्याबाबत कार्यवाही करावी. E-Tender मध्ये Online निविदा उघडताना परत DSC द्वारे Login करून घ्यावे. निदिदाधारक यांच्या प्राप्त निविदा उघडता येते.

10. ACCEPT E-TENDER

पोर्टल वर दिसणाऱ्या निविदा ह्या स्वीकृत कराव्या लागतात. यासाठी DSC LOGIN करावी लागते.

11. OPEN TECHNICAL COVER – 1

E-Tender निविदा उघडताना प्रथम पहिला लिफाफा (First Cover) ज्यात निविदाधारक यांनी तांत्रिक माहिती भरली तो लिफाफा म्हणजे Technical Cover उघडावा. आणि त्यातील मागितलेले सर्व कागदपत्रे तपासावी. व त्याबाबत सूची तयार करावी.

12. OPEN FINANCIAL COVER – 2

सर्व कागदपत्रे बरोबर असेल तर पुढील लिफाफा क्रमांक २ आर्थिक लिफाफा (Finalcial Cover) उघडावा यात काम करण्याबाबतचे दर असते. हाही लिफाफा उघडताना DSC login करणे आवश्यक असते. हा लिफाफा उघडल्यावर निविदाधारक यांनी नमूद केलेले कामाचे दर तपासून घ्यावे. आणि त्याचा तुलनात्म तक्ता तयार करावा.

13. LOWEST E-TENDER – 1

उघालेल्या दुसऱ्या लिफाफा (COVER) नन्तर त्यातील कमीतकमी/ न्यूनतम दर (Lowest-1) दर असलेल्या निविदाधारक यांना अधोरेखित ओंलीने केले जाते. त्यांना सदर कामाची निविदा मंजूर केली जाते.

14. CHAKE ADDITIONAL SECURITY FERFORMANCE DD (IF BELOW TENDER)

निविदा धारक यांनी नमूद केलेले दर कमी असेल तर त्याप्रमाणात त्यांना अतिरिक्त सुरक्षा रक्कम शासन निर्णयानुसार लिफाफा क्रमांक २ मध्ये जमा करणे आवश्यक आहे.. याकरिता अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराच्या निनिदा प्राप्त झाल्यास तयांच्या स्विकृती संदर्भात अनुसरण्याच्या सुधारीत मार्गदर्गक सूचना महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय क्र.बीडीजी 2016/प्र.क्र. 2/इमा.2 दिनांक १२/२/२०१६ नुसार निर्गमित केल्या आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ई-निविदा संदर्भात दिनांक २७/०९/२०१८ च्या शासन निर्णयातील तरतुदीचे स्पष्ठीकरण अंतर्गत महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शासन परिपत्रक क्रमांक सीएटी /२०१७/प्र.क्र.०८/इमा-२ दिनांक २६/११/२०१८ नुसार निविदाधारक १० % दराच्या कमी पर्यंत असेल तर त्याची काम करून घेण्याची खात्री तपासून घ्यावी. निविदाधारक यांचा अतिरिक्त सुरक्षा रक्कम (निविदा रकमेच्या १ %) असलेला धनाकर्ष लिफाफा क्रमांक २ मध्ये सादर करावा. (१ ते १० % पर्यंत १ % अतिरिक्त सुरक्षा रक्कम सादर करावी). जर निविदाधारक १५ % पेक्षा कमी दराचा असल्यास उव्रीत रकमेसाठी दोन पतीने रक्कम D.D. द्वारे सादर करणे अनिवार्य राहील. उदा. १९ % कमी दारासाठी खालीलप्रमाणे पृथ;कारण :- १५ % कमी दर – १० % पर्यंत १ % आणि १५ % पर्यंत कमी दर पर्यंत (१५ % – १० %) – ५ % तसेच (१९ % – १५ %) = ४ % करिता (४ * २ = ८ %) असे ऐकून (१ + ५ + ८ = १४ % ) D.D. घेणे बंधनकारक आहे.

15. AOC (AWARD OF CONTRACT)

निविधाधारक यांच्याकडून अतिरिक्त सुरक्षा रक्कम प्राप्त झाल्यावर त्यांना कामाचा आदेश AOC (Award Of Contract) देऊन त्यांच्या सोबत करारनामा करावा. कामाचा आदेश AOC (Award Of Contract) हा सुद्धा online प्रणालीद्वारे मंजूर निविदाधारक यांना देणे आवश्यक आहे. तो Ofline द्वारे दिल्यास ते अधिकृत होत नाही. आणि कामाचा आदेश देण्याची प्रक्रिया हि झालीच नाही असे Online प्रालीवर दिसून पडते. थोडक्यात निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असे म्हणता येत नाही.
निविधाधारक यांच्याकडून अतिरिक्त सुरक्षा रक्कम प्राप्त झाल्यावर त्यांना कामाचा आदेश AOC (Award Of Contract) देऊन त्यांच्या सोबत करारनामा करावा. कामाचा आदेश AOC (Award Of Contract) हा सुद्धा online प्रणालीद्वारे मंजूर निविदाधारक यांना देणे आवश्यक आहे. तो Ofline द्वारे दिल्यास ते अधिकृत होत नाही. आणि कामाचा आदेश देण्याची प्रक्रिया हि झालीच नाही असे Online प्रालीवर दिसून पडते. थोडक्यात निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असे म्हणता येत नाही.
  • All Posts
  • अभियान बाबत
  • माहिती जाणून घ्या...!
  • योजना बाबत
E-TENDER

December 7, 2025/

Hot News E-TENDER TENDER मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj...

TENDER

December 7, 2025/

Hot News E-TENDER TENDER मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj...

Scroll to Top