gp panchayat

GP Other Record

GP Other Record महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार ठेवणे आवश्यक आहे. पंचायतला १ ते ३३ नमुन्यात अद्यावत अभिलेखे ठेवणे आवश्यक आहे तसेच त्याच प्रमाणे ग्रामपंचायत इतर अभिलेखे व नोंदवह्या ह्या महत्वाच्या असून त्या पंचायतीने दप्तरी अद्यावत ठेवणे बंधनकारक आहे. आणि त्याची प्रभावी अमलबजावणी अधिनियमानुसार करणे महत्वाचे व आवश्यक आहे.

ग्रामपंचायत GP Other Record माहिती खालीलप्रमाणे आहे.

१. सभेचे कामकाज किवा इतिवृत्त नोंदवही

GP Other Record

ग्रामपंचायत GP Other Record मध्ये  ग्राम पंचायतीला ठेवण्यात येणारी हि अत्यंत महत्वाची नोंदवही आहे. दिनांक १ एप्रिल २०१४ पासून ग्रामसभा/ मासिक सभा/ महिलासभा/ वार्ड सभा/ विविध समित्याच्या सभा ह्या विहित नमुन्यात लिहिण्यात याव्यात यासंदर्भात महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक संग्राम-२०१४/प्र.क्र. ४३/संग्राम कक्ष मुबई- ४०० ००१, दिनांक २५ जून २०१४ शासन निर्णय काढला असून त्यात विहित नमुना दिला आहेत. या शासन निर्णयातील परिशिष्ट – ब मध्ये दिलेल्या विहित नमुन्यातच प्रत्येक सभेची स्वतंत्र नोंदवही / इतिवृत्त ठेवावी असे नमूद आहे. पंचायतीच्या बैठका/ सभा झाल्यावर सर्व प्राधान्याने त्या सभेचे इतिवृत्त लिहिण्यात यावे.

२. सभेची नोटीस नमुना

ग्रामपंचायत इतर अभिलेखे अंतर्गत ग्राम पंचायतीला घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा/ मासिक सभा/ महिलासभा/ वार्ड सभा/ विविध समित्याच्या सभा करिता सभेच्या सूचना देणे आवश्यक असते, याकरिता महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक संग्राम-२०१४/प्र.क्र. ४३/संग्राम कक्ष मुबई- ४०० ००१, दिनांक २५ जून २०१४ शासन निर्णयानुसार सभेच्या सूचना नमुना परिशिष्ट – अ मध्ये विहित नमुन्यात दिला असून त्या नमुन्यात सभेच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात.

३. अनुदानाची नोंदवही

ग्रामपंचायत इतर अभिलेखे अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ मधील नियम ३८ (१) नुसार जिल्हा परिषद किवा शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानाची नोन हि स्वतंत नोंदवहीत ठेवणे आवश्यक आहे, त्याकरिता या नियमात सादर नमुना दिला आहे त्या नमुन्यात माहिती अद्यावत ठेवणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत इतर अभिलेखे मध्ये हा देखील महत्वाचा नमुना आहे. या नमुन्यामुळे विविध योजनेचे प्राप्त औदान याची स्वतंत्र माहिती त्वरित उपलब्द होण्यास मदत होते.

४. वेतनवाढ नमुना

ग्रामपंचायत इतर अभिलेखे अंतर्गत पंचायतीला नियमित कार्यरत असलेल्या कर्मचारी यांची सेवा सलग एक वर्षाच्या कालावधीची सेवा पूर्ण केली असल्यास, पंचायतीच्या मान्यतेने असा कर्मचारी वेतन वाढी करिता पात्र असेल. त्याकरिता महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ मधील नियम ४१ नुसार विहित नमुना दिला आहे. त्या विहित नमुन्यात त्याची माहिती दप्तरी ठेवणे आवश्यक आहे.

५. वाहन रोज वहीचा नमुना

ग्रामपंचायत इतर अभिलेखे अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ मधील नियम ४७ (८) नुसार पंचायतीकडे वाहन असल्यास वाहनाचा वापर व खर्च यावर नियत्रण ठेवणे करिता वाहन नोंदवही ठेवण्यात येईल असे नमूद आहे, त्याकरिता या नियमात विहित नमुना दिला आहे, त्या नमुन्यात माहिती ठेवणे आवश्यक आहे.

६. दूरध्वनी नोंदवही

ग्रामपंचायत इतर अभिलेखे अंतर्गत पंचायतीला दूरध्वनी असेल तर महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ मधील नियम ४८ (१) नुसार नोदवही ठेवली पाहिजेत. या नियमात विहित नमुना दिला आहे.

७. प्रकल्प नोंदवही

ग्रामपंचायत इतर अभिलेखे अंतर्गत बांधकामाच्या प्रकल्पाची नोंदवही महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ मधील नियम ५३ (१) नुसार ठेवणे आवश्यक आहे. या नियमात सदर नमुना दिला आहे.

८. प्रतिभूती ठेव नोंदवही

ग्रामपंचायत इतर अभिलेखे अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ मधील नियम १२ (६) नुसार प्रतिभूती ठेव ठेवणे बंधनकारक आहे, त्याची नोंद कार्यालयात दप्तरी ठेवणे आवश्यक आहे. सदर नमुना या नियमात दिला आहे.

९. प्रतिभूती बंधपत्र नमुना

ग्रामपंचायत इतर अभिलेखे अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ मधील नियम १२ (६) नुसार पंचायतीला कार्यरत कर्मचारी यांच्याकडून प्रतिभूती बंधपत्र भरून घेणे आवश्यक व बंधनकारक आहे. सदर नमुना या नियमात दिला असून तो दप्तरी ठेवणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ मधील नियम व त्यानुसार वरील नमुने देखील पंचायतीच्या GP Other Record मध्ये दप्तरी ठेवणे आवश्यक आणि बंधनकारक आहे,

  • All Posts
  • अभियान बाबत
  • माहिती जाणून घ्या...!
  • योजना बाबत
Jayanti Utsav Grampanchayat NOC

February 14, 2026/

Jayanti Utsav Grampanchayat NOC Jayanti Utsav Grampanchayat NOC 2026 कशी घ्यावी? संपूर्ण प्रक्रिया, कागदपत्रे, अर्ज नमुना आणि नियम Chatrapati Shivaji...

GP Other Record

December 19, 2025/

GP Other Record GP Other Record महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार ठेवणे आवश्यक आहे. पंचायतला १ ते ३३ नमुन्यात अद्यावत...

Itar Namune

December 14, 2025/

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...

e-tender

December 7, 2025/

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...

TENDER

December 7, 2025/

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...

Jayanti Utsav Grampanchayat NOC

Jayanti Utsav Grampanchayat NOC

Jayanti Utsav Grampanchayat NOC Jayanti Utsav Grampanchayat NOC 2026 कशी घ्यावी? संपूर्ण प्रक्रिया, कागदपत्रे, अर्ज नमुना आणि नियम Chatrapati Shivaji...
Read More →
1 Te 33 Namune

1 Te 33 Namune

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...
Read More →
E-TENDER

Scroll to Top