TENDER कसे करावे ?
1. TENDER प्रक्रिया
१. TENDER प्रक्रिया करीत असताना आपणाकडे ज्या कामाचे TENDER करावयाचे आहे, त्या कामाचे प्राकलन (ESTIMATE) असणे आवश्यक आहे. ESTIMATE ला तांत्रिक मंजुरी (Technical Santion) पंचायत समिती किवा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उप अभियंता यांच्याकडून घेतलेली असावी. तसेच सदर कामास व Estimate ला प्रशासकीय मंजुरी सुद्धा घेतालीली असावी लागते. वरील दोन्ही बाबी असेल तरच पुढील प्रक्रिया पार पाडावी.
२. प्राकलन (ESTIMATE) ला ग्राम पंचायतीचा काम मंजुरीचा व प्रशासकीय मंजुरीचा ठराव घेणे आवश्यक आहे, तो असलाच पाहिजेत.
३. काम करावयाच्या जागेचा स्थळ GPS फोटो (location) सह लावलेला असावा.
४. काम करावयाची जागा हि स्व मालकीची असल्याचा ठराव प्रत लावलेली असावी.
५. कामाची बांधकाम परवानगी व कामाची देखभाल व दुरुस्ती करण्याची हमी ठराव घेणे आवश्यक आहे.
2. TENDER बोलाविणे
वरिष्ठ कार्यालयाकडून कामाची जाहिरात देण्यासाठी कामाच्या किमती नुसार वृत्तपत्राचे रोस्टर घ्यावे. TENDER किवा निविदा प्रसिद्धी बाबतचा मसुदा तयार करावा लागतो. या मसुदा मध्ये साधारणता खालील बाबी समाविष्ट करणे आवश्यक आहे.
१. निविदाची वेळ क्रमांक – १, २, किवा ३ जी असेल ती वर नमूद करावे.
२. कार्यालयाचा पूर्ण पत्ता नमूद करावा.
३. निविदा बोलाविण्याचा कालावधी दिनांक पासुन ते पर्यंत स्पष्ट नमूद करावा.
४. निविदा उघडण्याची तारिख, वेळ व स्थळ नमूद करावे.
५. निविदा फी, निविदा बयाना रक्कम (प्राकलन (ESTIMATE) च्या १ टक्का) नमूद करावी.
६. निविदा दोन लिफाफा पद्धतीने घ्यावी. यात एक तांत्रिक लिफाफा (मागितलेली कागदपत्रे) व दुसरा आर्थिक लिफाफा (कामाचे दर) या प्रमाणे निविदाधारक यांच्याकडून निविदा बोलवावी.
७. निविदेच्या अटी व शर्ती स्पष्ट नमूद कराव्यात. यात निविदाधारक यांच्या कडून आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्राचा उल्लेख करावा. (उदा. नोंदणी प्रमाणपत्र, pancard, Adhar Card, GST, व्यवसाय कर व उत्पन्न कर भरल्याबाबत प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, सुरु असलेली कामे, पूर्ण केलेली कामे बाबत माहिती व काळ्या यादीत नसल्याबाबत व चुकीची माहिती सादर न केल्याबाबत प्रतिज्ञालेख व इतर आवश्यक अनुषंगिक माहिती मागवावी.)
3. TENDER निविदा शुद्धीपत्रक
4. TENDER निविदा स्वीकृती
हि प्रक्रिया अत्यंत महत्वाची व न समझणारी व गुंतागुंतीची आहे. या बारकाईने कार्यवाही करणे आवश्यक आहे.
१. प्राप्त होणाऱ्या प्रत्येक निविदा ह्या आवक नोंदणी बुकात घेणे आवश्यक आहे. निविदा कालावधी संपल्यावर आपल्या आवक नोंदणी बुकात किती निविदा आल्या त्या तपासून घेणे.
२. निविदा किती आल्या ह्या आवक नोंदणी बुकावरून तपासून घ्याव्यात, निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी व स्पर्धातम विचार व्हावा यासाठी किमान तीन निविदा मध्ये तुलनात्मक स्पर्धा होणे आवश्य<क आहे. यांचा अर्थ निविदा प्रक्रिया पूर्ण करणेसाठी किमान तीन निविदा प्राप्त होणे आवश्यक आहे.
३. कामाच्या तीन निविदा प्राप्त न झाल्यास परत निविदा- दुसरी वेळ असे नमूद करून निविदा पुन्हा पूर्वीप्रमाणे प्रसिद्धीची कार्यवाही करावी.
४. दुसऱ्या निविदेच्या वेळेला देखील किमान तीन निविदा प्राप्त न झाल्यास परत निविदा – तिसरी वेळ असे नमूद करून निविदा पुन्हा पूर्वीप्रमाणे प्रसिद्धीची कार्यवाही करावी.
५. तिसऱ्या निविदेच्या वेळी मात्र तीन निविदा प्राप्त न झाल्यास देखील निविदा उघडता येईल व त्याबाबत कार्यवाही करावी.
६.प्राप्त निविदा लिफाफा वर वर कामाचे नाव व तांत्रिक मंजुरी क्रमान व रक्कम नमूद असावी. तसेच प्रेषक म्हणून निविदाधारक यांचा संपूर्ण पत्ता व शिक्का असणे आवश्यक आहे, (निविदा कोणाची आहे ते समजण्यासाठी)
. आवक नोंद वहीत प्राप्त निविदा यांना निविदा प्रक्रियेत स्वीकृत करावे.
5. TENDER निविदा उघडणे प्रक्रिया
१. निविदा स्वीकृत केल्यानंतर सदर प्रवेशपात्रा निविदा उघडताना निविदा समितीच्या सभेत ज्या निविदाधारक यांनी निविदा सादर केल्यात त्यांना निविदा उघडण्याच्या कार्यवाही करिता आमंत्रित करावे. त्यांच्या समक्ष निविदा शिलबंद लिफाफा क्रमांक -१ (तांत्रिक लिफाफा) निविदा समितीने उघडावे आणि उपस्थित निविदाधारक यांच्या समोर वाचून दाखवावे.
२. वरील लिफाफा क्रमांक १ वर कोणाचे आक्षेप नसेल किवा मागितलेले कागदपत्रे योग्य असेल तरच लिफाफा क्रमान २ (आर्थिक लिफाफा) उघडण्यासाठी निविदा समितीने हाती घ्यावा, जर लिफाफा क्रमांक १ मध्ये आवश्यक कागदपत्रे निविदाधारक यांच्याकडून प्राप्त न झाल्यास दुसरा लिफाफा उघडण्यात येऊ नये.
३. लिफाफा क्रमांक १ मधील कागदपत्रे योग्य असेल तर त्याचा गोषवारा (कोण कोणते कागदपत्रे आहे त्याबाबत) तयार करावा. व नत्राच लिफाफा क्रमांक २ उघड्न्यासाठी निविदा समितीने हाती घ्यावा. शिलबंद लिफाफा असल्याची खात्री करावी आणि लिफाफा उघडण्यापूर्वी निविदा स्वीकृत किवा प्रवेश पात्र केल्याबाबत आणि OPEN BY ME म्हणून सरपंच व सचिव यांचा सही व शिक्का त्यावर मारावा आणि दिनांक टाकावा.
४. निविदा क्रमांक २ सर्वा समक्ष उघडावा याही लिफाफा वर OPEN BY ME म्हणून सरपंच व सचिव यांचा सही व शिक्का त्यावर मारावा आणि दिनांक टाकावा. उघडलेल्या लिफाफा व त्या मधील निवि दाधारक यांनी निविदा घेण्याचे जे दर नमूद केले ते वाचून दाखवावे व त्याचा तुलनात्मक तक्ता तयार करावा व कमीतकमी/ न्यूनतम दर (Lowest-1) दर असलेल्या निविदाधारक यांचे नाव वाचून दाखवावे तसेच इतर सर्व निविदाधारक यांचे देखील दर वाचुन दाखवावे व त्या खाली निविदा समिती यांनी स्वाक्षरी करावी व उपस्थित निविदाधारक यांच्या सह्या देखील पारदर्शकता करिता घेता येईल. तसेच सभेच्या कार्यवृतांत वहीत सभेला उपस्थित सर्व निविदाधारक यांच्या स्वाक्षरी घ्याव्यात, जेणे करून निविदा प्रक्रिया पारदर्शक होईल
6. कामाचा आदेश
१. निविदा धारक यांनी नमूद केलेले दर कमी असेल तर त्याप्रमाणात त्यांना अतिरिक्त सुरक्षा रक्कम शासन निर्णयानुसार लिफाफा क्रमांक २ मध्ये जमा करणे आवश्यक आहे. याकरिता अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराच्या निनिदा प्राप्त झाल्यास तयांच्या स्विकृती संदर्भात अनुसरण्याच्या सुधारीत मार्गदर्गक सूचना महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय क्र.बीडीजी 2016/प्र.क्र. 2/इमा.2 दिनांक १२/२/२०१६ नुसार निर्गमित केल्या आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ई-निविदा संदर्भात दिनांक २७/०९/२०१८ च्या शासन निर्णयातील तरतुदीचे स्पष्ठीकरण अंतर्गत महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शासन परिपत्रक क्रमांक सीएटी /२०१७/प्र.क्र.०८/इमा-२ दिनांक २६/११/२०१८ नुसार
निविदाधारक १० % दराच्या कमी पर्यंत असेल तर त्याची काम करून घेण्याची खात्री तपासून घ्यावी. निविदाधारक यांचा अतिरिक्त सुरक्षा रक्कम (निविदा रकमेच्या १ %) असलेला धनाकर्ष लिफाफा क्रमांक २ मध्ये सादर करावा. (१ ते १० % पर्यंत १ % अतिरिक्त सुरक्षा रक्कम सादर करावी). जर निविदाधारक १५ %
पेक्षा कमी दराचा असल्यास उव्रीत रकमेसाठी दोन पतीने रक्कम D.D. द्वारे सादर करणे अनिवार्य राहील. उदा. १९ % कमी दारासाठी खालीलप्रमाणे पृथ;कारण :-
१५ % कमी दर – १० % पर्यंत १ %
आणि १५ % पर्यंत कमी दर पर्यंत (१५ % – १० %) – ५ %
तसेच (१९ % – १५ %) = ४ % करिता (४ * २ = ८ %) असे ऐकून (१ + ५ + ८ = १४ % ) D.D. घेणे बंधनकारक आहे.
२. निविधाधारक यांच्याकडून अतिरिक्त सुरक्षा रक्कम प्राप्त झाल्यावर त्यांना कामाचा आदेश देऊन त्यांच्या सोबत करारनामा करावा.
- All Posts
- अभियान बाबत
- माहिती जाणून घ्या...!
- योजना बाबत

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) ग्राम पंचायत निवड

मुख्यमंत्री-समृद्ध-पंचायतराज-अभियान-mukhyamantri-samrudha-panchayatraj-abhiyan



