Gram Panchayat Budget Creation ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?
Gram Panchayat Budget Creation ग्रामपंचायतीचे अर्थसंकल्प महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील नियम १८ (१), १९ व २० (११) नुसार तयार केले जाते. अंदाज पत्रकात खालील बाबी महत्वाच्या असतात.
- पंचायत, पुढील वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प वित्तीय वर्षाच्या ३१ तारखेस किंवा त्यापूर्वी पंचायत समितीला सादर करेल.
- अर्थसंकल्पीय अनदाजपत्रकातील जमा रक्कमा ह्या कर, शुल्क व फी यावर आधारित असतील.
- अंदाजित महसूल संबधित माहितीवर आधारित असेल.
- १ एप्रिल पासून मार्च अखेर पर्यंत जमा अपेक्षित असलेली प्रत्यक्ष रक्कमच केवळ सादर करण्यात येईल.
- अंदाजित खर्चाची परिगणना करताना, मागील तीन वर्षांची सरासरी सर्वसाधारण खर्च विचारात घेण्यात येईल.
- वेतन – यात सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, रजा प्रवास भत्ता यांचा समावेश असेल. वर्षाच्या वेतन वाढीचा यात समावेश करण्यात येईल.
- “प्रवासभत्ता” यात पंचायतीच्या कामकाजासाठी प्रवास करण्याकरिता कर्मचाऱ्यांना व सदस्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहन भत्ता व प्रवासभत्ता यांचा समावेश राहील.
- कार्यालयीन खर्च – यात फर्निचर, टपाल खर्च, कार्यालयीन कामकाजासाठी लागणारे सर्व साहित्य आणि अन्य साधन समुग्रीची खरेदी, तिचे परीक्षण ,उष्ण हवामान, थंड हवामान, दूरध्वनी खर्च, वीज खर्च, कार्यालयीन लेखन सामुग्री, मुद्रित नमुने, पंचायतीच्या वापरातील वाहनाचे (रुग्ण वाहिका, टाकाऊ वाहन, प्रवासी वाहन, अग्निशामक पथक वगळून) परीक्षण, पंचायत समितीच्या बैठकावरील खर्च, अत्यावश्यक समुग्रीवरील खर्च आणि अन्य आकस्मित खर्च यांचा समावेश होईल.
- आस्थापनेवरील खर्च – ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या २५% पर्यंत मर्यादित असेल.
- जिल्हा ग्राम विकास निधी – जिल्हा ग्रामविकास निधीच्या अंशदानसाठी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या ०.२५% इतक्या रकमेची तरतूद करण्यात येईल.
- मागासवर्गीय लोकांसाठी करावयाच्या खर्चासाठीग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या १५% इतकी रक्कम खर्च करण्याची तरतूद करण्यात येईल.
- कलम १३१ व १३२ अनुसार जमीन महसुलीखाली जमा झलेल्या रकमेच्या ३५% इतकी रक्कम पंचायतीचे अंशदान म्हणून ग्रामीण रोजगार निधीत जमा करण्यात येईल.
Gram Panchayat Budget Creation ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पात ज्या वर्षाचे अर्थसंकल्प तयार करावयाचे आहे, त्या वर्षाची अंदाजे जमा व अंदाजे खर्च दोन्ही बाबी नमूद करणे आवश्यक असतात. तसेच त्या मागील वर्षाचे अंदाज पत्रकात नमूद असलेले जमा व खर्च अंदाजपत्रकाच्या दुस-या स्तंभात आणि तिसऱ्या व चौथ्या स्तंभात त्या मागील दोन वर्षाचा प्रत्यक्ष जमा व खर्च अचूक नमूद करणे आवश्यक असतो.
अर्थसंकल्पात Gram Panchayat Budget Creation जमा बाजूस खालील बाबी घेतलेल्या असतात.
ग्राम निधी जमा
(एक) (अ) कर :-
या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. मालमत्ता कर + जमिनी व इमारती यावरील कर
२. दिवाबत्ती कर
३. स्वच्छता कर
४. दुकाने, कारखाने, लघुउद्योग व हॉटेल चालविणे बाबतीत कर
५. यात्रा कर
६. जत्रा उत्सव व इतर मनोरंजन कर
७. सायकल व इतर वाहनवरील कर
८. टोल टॅक्स
९. उतरू व मालावरील कर
१०. वन विकास कर
११. सेवा कर
१२. व्यापारी व अजीविका यावरील कर ( शेती व्यतिरिक्त)
१३. गुरांच्या बाजारावरील दलदलीचा व्यवसाय व आजीविकावरील कर
१४. इतर
(एक) (ब) करेत्तर उत्पन्न
या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. बाजार फी
२. टांगा स्टँड फी
३. कर स्टँड फी
४. पाणी पट्टी
५. स्वच्छता फी
६. गाय चरण फी
७. DVDF व्याज २.५%
८. जमीन भाडे पट्टी
९. व्याज जमा
१०. जागा भाडे
११. कोंडवाडा जमा
१२. देणगी
१३. इतर जमा
(एक) (क) अभिहंस्ताकित रक्कम
या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. मुद्रांक शुल्क
२. उपकर
३. जमीन महसूल
४. जमिन समाणिकरण
५. गौण खनिज
६. पथ दिवाबत्ती देयकातील भरणा करणेसाठी अनुदान
७. नळ पाणी पुरवठा देयकासाठी ५०% अनुदान
८. मागास व आदिवासी क्षेत्रासाठी साहाय्य
९. यात्रा करा ऐवजी अनुदान
१०. जकात नुकसान भरपाई अनुदान
११. इतर अनुदान
(दोन) (अ) राज्य शासनाचे साहाय्यक अनुदाने
या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. शोचालय
२. दलित वस्ती सुधार
३. पाणी पुरवठा/TCL
४. बांधकाम
५. शिक्षण शाळा
६. मानधन,किमान वेतन व बैठक भत्ता
७. आरोग्य
८. इतर
(दोन) (ब) आमदार, खासदार, डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत जि. ग्रा. वि. यंत्रणेकडून आलेला निधी
या भागात वरील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
(तीन) केंद्र शासनाच्या अनुदाने जमा
या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. MGNREGA
२. १५ वित्त आयोग
३. इतर
(चार) संकीर्ण जमा
या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. अनामत/प्रतिभूती
२. ठेवी
३. कर्ज
४. इतर
(पाच) प्रारंभीची शिल्लक
या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. अनामत/प्रतिभूती
२. ठेवी
३. कर्ज
४. इतर
(सहा) प्रारंभीची शिल्लक
या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. जावाहर ग्राम समृद्धी योजना निधी
२. ग्राम पाणीपुरवठा निधी
३. ग्रामपंचायत निधी
४. म.गांधी रा.ग्रा.रो.ह.योजना निधी
५. १५ व वित्त आयोग
६. दलीतवस्ती निधी
७. इतर विकास निधी
Gram Panchayat Budget Creation करताना शेवटी वरील सर्वांची (१ ते ६) एकून बेरीज नमूद करावी लागते. हि ऐकून बेरीज एकून खर्चाच्या बाजूशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे.
अर्थसंकल्पात Gram Panchayat Budget Creation खर्च बाजूस खालील बाबी घेतलेल्या असतात.
ग्राम निधी खर्च
(एक)
या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. सरपंच मानधन
२. सदस्य बैठक भत्ता
३. सदस्य/सरपंच प्रवास भत्ता
४. कर्मचारी वेतन
५. कर्मचारी प्रवास भत्ता/गणवेश
६. कार्यालयीन खर्च
७. दुरुस्ती व देखभाल
८. स्वच्छता
९. पाणी पुरवठा संबंधित अनुषंगिक खर्च
१०. वीज देयक यात (अ) – पाणी पुरवठा (ब) – रस्त्यावरील दिवाबत्ती
११. पथ दिवाबत्ती
१२. शिक्षण
१३. आरोग्य
१४. रस्ता व गटारे
१५. अन्य बांधकाम
१६. वाचनालय
१७. जलशुद्दीकरण/TCL
१८. बाग व मैदान
१९. समाजकल्याण (आदिवासी व मागासवर्गीय) १५%
२०. DVDF वर्गणी ०.२५%
२१. महिला व बालकल्याण १०%
२२. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम
२३. कोंडवाडा
२४. साहित्य खरेदी
२५. शेती
२६. दिव्यांग कल्याण ५%
२८. इतर खर्च
(दोन) (अ) राज्य शासनाचे साहाय्यक अनुदाने खर्च
या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. शोचालय
२. दलित वस्ती सुधार
३. पाणी पुरवठा/TCL
४. बांधकाम
५. शिक्षण शाळा
६. मानधन,किमान वेतन व बैठक भत्ता
७. आरोग्य
८. इतर
(तीन) केंद्र शासनाच्या अनुदाने खर्च
या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. MGNREGA
२. १५ वित्त आयोग
३. इतर
(चार) संकीर्ण खर्च
या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. अनामत/प्रतिभूती
२. ठेवी
३. कर्ज
४. इतर
(पाच) अखेरची शिल्लक
या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. अनामत/प्रतिभूती
२. ठेवी
३. कर्ज
४. इतर
(सहा) अखेरची शिल्लक
या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. जावाहर ग्राम समृद्धी योजना निधी
२. ग्राम पाणीपुरवठा निधी
३. ग्रामपंचायत निधी
४. म.गांधी रा.ग्रा.रो.ह.योजना निधी
५. १५ व वित्त आयोग
६. दलीतवस्ती निधी
७. इतर विकास निधी
Gram Panchayat Budget Creation करताना शेवटी वरील सर्वांची एकून बेरीज नमूद करावी लागते. हि ऐकून बेरीज एकून जमेच्या बाजूशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे.
ग्रामसभेची मंजुरी
ग्राम पंचायत हि गावाच्या विकासाकरिता असलेली मुलभूत रचना आहे. गावाचा विकास नियोजन अतंत्य महत्वाचे असते. लोकसहभाग घेऊन तयार केलेले अर्थसंकल्प गावाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावतो आणि गाव विकासाला चालना देतो. म्हणून अर्थसंकल्पास Gram Panchayat Budget Creation ग्रामसभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायतीचे योग्य नियोजन, मार्गदर्शक तत्वे नुसार केलेले Gram Panchayat Budget Creation ग्रामपंचायत अर्थसंकल्प हा गाव स्वयंपूर्ण व समृद्ध बनवू शकतो.
- All Posts
- अभियान बाबत
- माहिती जाणून घ्या...!
- योजना बाबत

gp namunan 12 ग्राम पंचायत नमुना १२ अकस्मात खर्चाचे प्रमाणक ग्रामपंचायत नमुना -१२ हे ग्रामपंचायतीचे अकस्मात खर्चाचे प्रमाणक आहे. सदर...

gp namuna 5 cashbook kase lihawe ? ग्रामपंचायत नमुना – ५ (सर्वसाधारण रोकडवही) कसे लिहावे ? ग्रामपंचायत नमुना – ५...

Gram Panchayat Warshik Ahawal Creation ग्रामपंचायत वार्षिक अहवाल कसा तयार करावा ? महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील नियम २६...

Jayanti Utsav Grampanchayat NOC Jayanti Utsav Grampanchayat NOC 2026 कशी घ्यावी? संपूर्ण प्रक्रिया, कागदपत्रे, अर्ज नमुना आणि नियम Chatrapati Shivaji...

Nivadnuk Prachar Sabha Baner NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने लोकशाही मध्ये निवडणूक हि अत्यंत महत्वाची प्रक्रिया...

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे...

Nagrik Sahabhag Ani Gav Vikas Nagrik Sahabhag Ani Gav Vikas गाव विकासगाव विकास हि संकल्पना हि परिवर्तनाचा विचार मांडणारी आहे....

GP Other Record GP Other Record महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार ठेवणे आवश्यक आहे. पंचायतला १ ते ३३ नमुन्यात अद्यावत...

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) ग्राम पंचायत निवड

मुख्यमंत्री-समृद्ध-पंचायतराज-अभियान-mukhyamantri-samrudha-panchayatraj-abhiyan