Gram Panchayat Warshik Ahawal Creation ग्रामपंचायत वार्षिक अहवाल कसा तयार करावा ?
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील नियम २६ (१) (२) नुसार Gram Panchayat Warshik Ahawal Creation ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल तयार केले जाते. वार्षिक अहवाल नमुना ३ व ४ मध्ये खालील बाबी महत्वाच्या असतात.
• पंचायत, वार्षिक अहवाल वित्तीय वर्षाच्या ३१ मार्च संपल्यावर जमा-खर्चाचे ताळमेळ करून पंचायत समितीला सादर करेल.
• वार्षिक अहवालात जमा-खर्च बाबतच्या रकमा या प्रत्यक्ष बाबीवर आधारित असतील.
• १ एप्रिल पासून मार्च अखेर पर्यंत जमा व खर्च बाबत विवरण यात असेल.
• महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील नियम २६ (१) नुसार विहित नमुन्यात हा नमुना ३ दरवर्षी १ जून किवा त्यापूर्वी पंचायत समितीला सादर करतील.
• महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील नियम २६ (२) नुसार विहित नमुन्यात नमुना ४ पंचायतीचे मत्ते व दायित्व सादर करतील.
• सोबतच पूर्ण झालेली, सुरु असलेली, अपूर्ण कामे, प्रगती दर्शविणारा तपशील जोडणे आवश्यक आहे.
• पंचायतीने हाती घेतलेल्या योजनेचा तपशील, पंचायतीचे कर्जाचे व परतफेडीचा तपशील, केलेली गुंतवणूक व त्यावर मिळालेले व्याज बाबत तपशील, थकीत कारचा वसुलीचा तपशील, जोडणे आवश्यक आहे.
• तसेच लेखा परीक्षण अहवालातील परिच्छेद संख्या, कार्यवाही केलेले व वगळलेले परिच्छेद व शिल्लक तपशील बाबत विवरण सोबत जोडणे आवश्यक आहे.
• वार्षिक अहवाल तयार करीत असताना वर्ष भरात झालेला जमा- खर्च विचारात घेण्यात येईल.
Gram Panchayat Warshik Ahawal Creation ग्रामपंचायतीच्या वार्षिक अहवालात ज्या वर्षाचे वार्षिक अहवाल तयार करावयाचा आहे, त्या वर्षाची प्रत्यक्ष जमा व प्रत्यक्ष खर्च दोन्ही बाबी नमूद करणे आवश्यक असतात. वर्षाचा प्रत्यक्ष जमा व खर्च अचूक नमूद करणे आवश्यक असतो.
ग्राम निधी जमा
(एक) (अ) कर :-
Gram Panchayat Warshik Ahawal Creation या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. मालमत्ता कर + जमिनी व इमारती यावरील कर
२. दिवाबत्ती कर
३. स्वच्छता कर
४. दुकाने, कारखाने, लघुउद्योग व हॉटेल चालविणे बाबतीत कर
५. यात्रा कर
६. जत्रा उत्सव व इतर मनोरंजन कर
७. सायकल व इतर वाहनवरील कर
८. टोल टॅक्स
९. उतरू व मालावरील कर
१०. वन विकास कर
११. सेवा कर
१२. व्यापारी व अजीविका यावरील कर ( शेती व्यतिरिक्त)
१३. गुरांच्या बाजारावरील दलदलीचा व्यवसाय व आजीविकावरील कर
१४. इतर
(एक) (ब) करेत्तर उत्पन्न –
Gram Panchayat Warshik Ahawal Creation या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो
१. बाजार फी
२. टांगा स्टँड फी
३. कर स्टँड फी
४. पाणी पट्टी
५. स्वच्छता फी
६. गाय चरण फी
७. DVDF व्याज २.५%
८. जमीन भाडे पट्टी
९. व्याज जमा
१०. जागा भाडे
११. कोंडवाडा जमा
१२. देणगी
१३. इतर जमा
(एक) (क) अभिहंस्ताकित रक्कम
Gram Panchayat Warshik Ahawal Creation या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो
१. मुद्रांक शुल्क
२. उपकर
३. जमीन महसूल
४. जमिन समाणिकरण
५. गौण खनिज
६. पथ दिवाबत्ती देयकातील भरणा करणेसाठी अनुदान
७. नळ पाणी पुरवठा देयकासाठी ५०% अनुदान
८. मागास व आदिवासी क्षेत्रासाठी साहाय्य
९. यात्रा करा ऐवजी अनुदान
१०. जकात नुकसान भरपाई अनुदान
११. इतर अनुदान
(दोन) (अ) राज्य शासनाचे साहाय्यक अनुदाने
Gram Panchayat Warshik Ahawal Creation या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो
१. शोचालय
२. दलित वस्ती सुधार
३. पाणी पुरवठा/TCL
४. बांधकाम
५. शिक्षण शाळा
६. मानधन,किमान वेतन व बैठक भत्ता
७. आरोग्य
८. इतर
(दोन) (ब) आमदार, खासदार, डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत जि. ग्रा. वि. यंत्रणेकडून आलेला निधी
(तीन) केंद्र शासनाच्या अनुदाने जमा
१. MGNREGA
२. १५ वित्त आयोग
३. इतर
(चार) संकीर्ण जमा
१. अनामत/प्रतिभूती
२. ठेवी
३. कर्ज
४. इतर
(पाच) प्रारंभीची शिल्लक
१. अनामत/प्रतिभूती
२. ठेवी
३. कर्ज
४. इतर
(सहा) प्रारंभीची शिल्लक
१. जावाहर ग्राम समृद्धी योजना निधी
२. ग्राम पाणीपुरवठा निधी
३. ग्रामपंचायत निधी
४. म.गांधी रा.ग्रा.रो.ह.योजना निधी
५. १५ व वित्त आयोग
६. दलीतवस्ती निधी
७. इतर विकास निधी
शेवटी वरील सर्वांची एकून बेरीज नमूद करावी लागते. हि ऐकून बेरीज एकून खर्चाच्या बाजूशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे.
वार्षिक अहवालात Gram Panchayat Warshik Ahawal Creation खर्च बाजूस खालील बाबी घेतलेल्या असतात.
ग्राम निधी खर्च
(एक)
Gram Panchayat Warshik Ahawal Creation या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. सरपंच मानधन
२. सदस्य बैठक भत्ता
३. सदस्य/सरपंच प्रवास भत्ता
४. कर्मचारी वेतन
५. कर्मचारी प्रवास भत्ता/गणवेश
६. कार्यालयीन खर्च
७. दुरुस्ती व देखभाल
८. स्वच्छता
९. पाणी पुरवठा संबंधित अनुषंगिक खर्च
१०. वीज देयक यात (अ) – पाणी पुरवठा (ब) – रस्त्यावरील दिवाबत्ती
११. पथ दिवाबत्ती
१२. शिक्षण
१३. आरोग्य
१४. रस्ता व गटारे
१५. अन्य बांधकाम
१६. वाचनालय
१७. जलशुद्दीकरण/TCL
१८. बाग व मैदान
१९. समाजकल्याण (आदिवासी व मागासवर्गीय) १५%
२०. DVDF वर्गणी ०.२५%
२१. महिला व बालकल्याण १०%
२२. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम
२३. कोंडवाडा
२४. साहित्य खरेदी
२५. शेती
२६. दिव्यांग कल्याण ५%
२८. इतर खर्च
(दोन) (अ) राज्य शासनाचे साहाय्यक अनुदाने खर्च
Gram Panchayat Warshik Ahawal Creation या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. शोचालय
२. दलित वस्ती सुधार
३. पाणी पुरवठा/TCL
४. बांधकाम
५. शिक्षण शाळा
६. मानधन,किमान वेतन व बैठक भत्ता
७. आरोग्य
८. इतर
(तीन) केंद्र शासनाच्या अनुदाने खर्च
Gram Panchayat Warshik Ahawal Creation या भागात खालील बाबी व रकमेचा समावेश असणे आवश्यक असतो.
१. MGNREGA
२. १५ वित्त आयोग
३. इतर
(चार) संकीर्ण जमा
१. अनामत/प्रतिभूती
२. ठेवी
३. कर्ज
४. इतर
(पाच) अखेरची शिल्लक
१. अनामत/प्रतिभूती
२. ठेवी
३. कर्ज
४. इतर
(सहा) अखेरची शिल्लक
१. जावाहर ग्राम समृद्धी योजना निधी
२. ग्राम पाणीपुरवठा निधी
३. ग्रामपंचायत निधी
४. म.गांधी रा.ग्रा.रो.ह.योजना निधी
५. १५ व वित्त आयोग
६. दलीतवस्ती निधी
७. इतर विकास निधी
शेवटी वरील सर्वांची एकून बेरीज नमूद करावी लागते. हि ऐकून बेरीज एकून जमेच्या बाजूशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायत वार्षिक अहवालाचे महत्व
2. निधीचा पारदर्शक वापर होतो.
3. विकासाला चालना मिळते.
4. योजना व निधीचे प्रभावी वापर झाला किवा नाही ते समजते..







