gp namuna 5 cashbook kase lihawe ? ग्रामपंचायत नमुना – ५ (सर्वसाधारण रोकडवही) कसे लिहावे ?
ग्रामपंचायत नमुना – ५ (सर्वसाधारण रोकडवही) कसे लिहावे ?
gp namuna 5 cashbook ग्रामपंचायत नमुना – ५ हा अत्यंत महत्वाचा रेकार्ड आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम १९ (७). २२(२), (३), (६), (७), (१०), २३, २४ (ख), व २५ (२) चा आधार घेऊन नमुना ५ मध्ये नोंदी करणे आवश्यक आहे. सदर नमुना हा विहित प्रपत्रात आखून दिला आहे. सदर नमुना ग्रामपंचायतीचे दैनदिन प्राप्त होणारी रक्कम आणि दैनदिन खर्च होणारी रक्कम याबाबत माहिती दर्शविणारा नमुना आहे.
gp namuna 5 cashbook या नमुन्यात ग्रामपंचायतीला जमा होणाऱ्या अंदाजपत्रकीय बाबी अर्थात नमुना १ नुसार जमा होणाऱ्या सर्व बाबी (कर, करेत्तर, अभिहस्तांकित रक्कमा, केंद्र शासन किवा राज्य शासन यांचे प्राप्त अनुदान, सुरुवातीची शिल्लक आणि अखेरची शिल्लक) यात नोंदविल्या असतात.
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम १९ (७) –
मागील रकमाची नमुना ३, नमुना ५ व नमुना ६ मध्ये उल्लेखित रकमाशी पडताळणी करून त्याचा ताळमेळ घालण्यात येईल.
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम २२(२) -
नमुना ७ व १० नुसार प्राप्त रकमा ह्या नमुना ५ – क मध्ये घेऊन तो नमुना ५ मध्ये घेणे आवश्यक आहे
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम (३) –
दैनिक रोकड वहीतील नमुना ५ क मधील रकमा ह्या नमुना ५ मध्ये घेणे आवश्यक आहे
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम (६) –
नमुना ५ क मध्ये प्राप्त सर्व रकमा आणि धनादेश जमा केले किवा नाही ते तपासून त्याची नोंद नमुना ५ मध्ये घ्यावी.
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम (७) –
कर वसुली लिपिक जमा रकमा त्याच दिवशी बँकेत जमा करतील आणि त्याची नोंद सचिव घेतील आणि तशी नोंद नमुना ५ मध्ये घेतील. कर लिपिक किवा सचिव यांच्याकडे ह्स्तरोख राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम (१०) –
नमुना ५ रोकड वही हि दररोज व्यवहार संपताच बंद केली जाईल. सरपंच व सचिव त्यावर स्वाक्षरी करतील.
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम २३ –
मनी ऑर्डर ने रक्कम आल्यास त्याची पण नोंद घेऊन त्याची नोंद नमुना ५ ला घेणे आवश्यक आहे
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम २४ (ख) –
नमुना ५ मध्ये ठेवलेल्या सर्वसाधारण रोकड वहिमधून रोखीने प्रदान करता येणार नाही.
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम २५ (२) –
नमुना ६ वर्गीकृत नोंद्वाहीमध्ये जमा व खर्च नोंदी घेतल्या जातील. रोकड वहीतील सर्व धनादेश व प्रमाणके या नोंदवहीत नोंदविण्यात येतील आणि प्रत्येक प्रधान शीर्षक खाली चढती बेरीज करण्यात येतील.
ग्रामपंचायत नमुना – ५ मध्ये खालील रकाने असतात
महिना व रक्कम जमा केल्याची तारीख –
gp namuna 5 cashbook च्या या रकान्यात ज्या महिन्यात व दिनांकाला ग्रामपंचायतीला कर, करेत्तर, अभिहस्तांकित रक्कमा, केंद्र शासन किवा राज्य शासन यांचे प्राप्त अनुदान जमा होईल तो दिनांक नमूद करावा लागतो.
अनुक्रमांक –
gp namuna 5 cashbook मध्ये जमा होणारी बाब हि ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत नमुना ७, नमुना १० या दोन नामुण्यावरूनच जमा होत असते त्यामुळे त्या नमुन्याचा अचूक अशा पावतीचा क्रमांक टाकणे आवश्यक आहे.
जमा रक्कम तपशील :-
(एक) – कोणाकडून मिळालीत –
यात ग्रामपंचायतीला जमा झालेल्या रकमेचा सामेवेश असतो..
(दोन) कशाबद्दल मिळालीत. –
यात ग्रामपंचायतीला जमा झालेली रक्कम हि कशाकरिता बद्दल मिळाली ते नमूद करावे. वरील सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतीला कर, करेत्तर, अभिहस्तांकित रक्कमा, केंद्र शासन किवा राज्य शासन यांचे प्राप्त अनुदान जमा होत असते, त्याची माहिती या ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे. यात सविस्तर लिहावे. उदा. १५ वा वित्त आयोगाचा सन —– चा प्रथम किवा द्वितीय बंधिस्त किवा अबंदिस्त हफ्ता, पानिकारी, मालमत्ता कर, मुद्रांक, गौण खनिज, लिलाव. गाळे भाडे किवा इतर बाबी ज्याचे वर्णन करावे जेणेकरून आपली बदली झाल्यावर प्रभार घेणारा किवा लेखा परीक्षक किवा तपासणी करणारा अधिकारी यांना त्याची स्पष्ट जाणीव होईल.
लेखा शीर्ष –
या रकान्यात महाराष्ट ग्रामपंचायत लेखासंहिता नुसार जमा होणाऱ्या करण्यात येणाऱ्या बाबीस लेखा शीर्ष दिले गेले आहे. ते स्वयं:स्पष्ट लिहिणे आवश्यक आहे. लेखा शीर्ष हे ग्रामपंचायत नमुना १ मध्ये दिले गेले आहेत. त्यात जे शीर्ष दिले तेच घेणे इतर हतने किवा म्हणाने किवा मर्जीने लिहू नये कारण ते ONLINE EGRAMSWARAJ प्रणालीत उपलब्द नाहीत. म्हणून मी अगोदर माझ्या अर्थसंकल्प नमुना १ कशा तयार करावा या याच WEBSITE वर POST केला आहे व सविस्तर सांगितले आहे. नमुना १ बनवीत असताना हाताने कोणतेही शीर्षक टाकू नये जे प्रिंटेड आहे तेच असू द्यावे आणि तेच असणे आवश्यक आहे अन्यथा नमुना १ चुकीचा तयार केला असा होतो.
रक्कम –
gp namuna 5 cashbook च्या या रकान्यात शीर्षकानुसार जमा होणारी रक्कम नमूद करावी.
प्रारंभीत शिलकेसह रोजची ऐकून रक्कम –
gp namuna 5 cashbook च्या या रकान्यात या तारखेत जमा झालेली एकून रक्कम आणि या खात्यात असलेली ऐकून प्रारंभीची शिल्लक यांची दोघांची बेरील करून ऐकून रक्कम नोंदवावी.
रक्कम दिल्याची तारीख व पावती क्रमांक –
हि बाब खर्चाची आहे यात एखाद्या देयक धारकास दिलेली रक्कम ज्या तारखेला दिली ती तारीख व देयकाचा पावती क्रमांक नमूद करावा.
धनादेश क्रमांक –
देयक ज्यांना अदा करण्यात येणार आहे. त्यांना सदर देयक रोख स्वरुपात देता येणार नाही, ते धनादेश द्वारेच द्यावे लागेल. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ चे नियमानुसार धनादेशद्वारेच रक्कम अदा करणे आवश्यक आहे.
प्रमाणक (व्हाऊचर) क्रमांक –
प्रत्येक आर्थिक वर्षात १ एप्रिल पासून नवीन प्रमाणक (व्हाऊचर) क्रमांक दिला जातो, तो साधारणता एक पासून सुरु होतो. तेव्हा प्रमाणक (व्हाऊचर) क्रमांक जे येईल तो तेथे नमूद करावा.
रक्कम दिल्याचा तपशील –
(एक) – कोणाला दिली –
यात ग्रामपंचायतीला खर्च करण्यात येणारी रक्कम हि कोणाला दिली त्याचा तपशील आर्थात नाव लिहिणे आवश्यक आहे. या रकान्यात एकाद्या फर्म ला किवा कंत्राटदार यांना रक्कम दिली असेल तर त्याचे व्यक्तिश: नाव न लिहिता त्या फर्म चे नाव लिहावे व धनादेश त्या फर्मच्या नावे वितरीत करावा.
(दोन) – कोणत्या कारणासाठी दिली –
ग्रामपंचायतीने सदर रक्कम हि कोणत्या कारणासाठी खर्ची घातली ते या ठिकाणी तपशीलवार लिहावे. मोघम स्वरुपात लिहू नये. उदा. कंत्राटदार यांना देयके दिली तर ते कोणत्या कामाचे आहे त्याचा तपशील प्रकालनानुसार लिहावा, तसेच त्या रस्त्याचे/नाली बांधकाम/इमारत बांधकाम बाबत योजना नाव व त्याचा तांत्रिक क्रमांक/वर्ष/रक्कम आणि झालेले मुल्यांकन हा तपशील लिहावा. लिहितानी खोडतोड करू नये. कंत्राटदार यांना एकाच धनादेशात २-३ कामाचे देयक देऊ नयेत. यदाकदाचित दिले गेले तर सर्व कामाचा तपशील व कोणत्या कामावर किती रक्कम वितरीत केली त्याचा तपशील लिहावा.
लेखा शीर्ष -
या रकान्यात महाराष्ट ग्रामपंचायत लेखासंहिता नुसार खर्च करण्यात येणाऱ्या बाबीस लेखा शीर्ष दिले गेले आहे. ते स्वयं:स्पष्ट लिहिणे आवश्यक आहे. लेखा शीर्ष हे ग्रामपंचायत नमुना १ मध्ये दिले गेले आहेत. त्यात जे शीर्ष दिले तेच घेणे इतर हतने किवा म्हणाने किवा मर्जीने लिहू नये कारण ते ONLINE EGRAMSWARAJ प्रणालीत उपलब्द नाहीत. म्हणून मी अगोदर माझ्या अर्थसंकल्प नमुना १ कशा तयार करावा या याच WEBSITE वर POST केला आहे व सविस्तर सांगितले आहे. नमुना १ बनवीत असताना हाताने कोणतेही शीर्षक टाकू नये जे प्रिंटेड आहे तेच असू द्यावे आणि तेच असणे आवश्यक आहे अन्यथा नमुना १ चुकीचा तयार केला असा होतो.
रक्कम –
या रकान्यात देयकास दिलेली रक्कम नमूद करावी.
अखेरच्या शिलाकेसह रोजची ऐकून रक्कम –
gp namuna 5 cashbook मध्ये ऐकून जमा आणि झालेला खर्च याचा ताळमेळ लागल्यावर अखेरची शिल्लक राहते. ती रक्कम बरोबर जुळली कि नाही याची बँक व रोकड वही याचा ताळमेळ जुळवावा. ऐकून जमा आणि ऐकून खर्च हा जुळणे आवश्यक आहे. बँक मधील जमा आणि ह्स्तरोख तपासून घ्या. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम (१४) नुसार रुपये १०००/- च्या वर स्थायी अग्रीम जवळ ठेवता येत नाही.
स्वाक्षरी –
gp namuna 5 cashbook ग्रामपंचायत नमुना ५ दिनांक नुसार लिहून झाल्यावर त्यावर सचिव व सरपंच यांनी स्वाक्षरी करावी.
महत्वाची टीप –
- प्रत्येक दिवशीचा व्यवहार बंद झाल्यावर रोख शिल्लक अंकात व अक्षरात लिहावी. सरपंचाने ती तपासून दिनांकासह स्वाक्षरी करावी व प्रमाणित करतील.
- प्रारंभी व अखेरच्या शिल्लक रकमेचे स्पष्टीकरण द्यावे. उदा. पोष्टात, बँकेत, मुदत ठेव, गुंतवणूक यांचा तपशील द्यावा.
- नमुना ५ मध्ये महिन्याच्या अखेरीस आर्थिक व्यवहाराची नोंद घेऊन त्याबाबतची एकत्रित माहिती नमुना २९ “क” मध्ये नोंदवावी.
ग्राम पंचायत नमुना १२ अकस्मात खर्चाचे प्रमाणक
April 13, 2026 | by DAD
gp namunan 12 ग्राम पंचायत नमुना १२ अकस्मात खर्चाचे प्रमाणक ग्रामपंचायत नमुना -१२ हे ग्रामपंचायतीचे अकस्मात खर्चाचे प्रमाणक आहे. सदर...
Read More →
ग्रामपंचायत नमुना – ५ (सर्वसाधारण रोकडवही) कसे लिहावे ? gp namuna 5 cashbook kase lihawe ?
April 12, 2026 | by DAD
gp namuna 5 cashbook kase lihawe ? ग्रामपंचायत नमुना – ५ (सर्वसाधारण रोकडवही) कसे लिहावे ? ग्रामपंचायत नमुना – ५...
Read More →
ग्रामपंचायत वार्षिक अहवाल कसा तयार करावा ?
April 4, 2026 | by DAD
Gram Panchayat Warshik Ahawal Creation ग्रामपंचायत वार्षिक अहवाल कसा तयार करावा ? महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील नियम २६...
Read More →
Jayanti Utsav Grampanchayat NOC
February 14, 2026 | by DAD
Jayanti Utsav Grampanchayat NOC Jayanti Utsav Grampanchayat NOC 2026 कशी घ्यावी? संपूर्ण प्रक्रिया, कागदपत्रे, अर्ज नमुना आणि नियम Chatrapati Shivaji...
Read More →
निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने
January 26, 2026 | by DAD
Nivadnuk Prachar Sabha Baner NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने लोकशाही मध्ये निवडणूक हि अत्यंत महत्वाची प्रक्रिया...
Read More →
ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?
January 17, 2026 | by DAD
Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे...
Read More →
नागरिक सहभाग आणि गाव विकास
January 11, 2026 | by DAD
Nagrik Sahabhag Ani Gav Vikas Nagrik Sahabhag Ani Gav Vikas गाव विकासगाव विकास हि संकल्पना हि परिवर्तनाचा विचार मांडणारी आहे....
Read More →
ग्रामपंचायत इतर अभिलेखे
December 19, 2025 | by DAD
GP Other Record GP Other Record महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार ठेवणे आवश्यक आहे. पंचायतला १ ते ३३ नमुन्यात अद्यावत...
Read More →
1 Te 33 Namune
December 14, 2025 | by DAD
Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...
Read More →
E-TENDER
December 7, 2025 | by DAD
Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...
Read More →
TENDER
December 7, 2025 | by DAD
Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...
Read More →
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली
November 29, 2025 | by DAD
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली
Read More →
Hot News







